Video : खान सरांनी केला रेकॉर्ड, तब्बल इतक्या बहिणींनी बांधली राखी, आकडा पहाल तर चक्कर येईल

आपल्या शिकविण्याच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले खान सर यांचा हात अक्षरश: राख्यांनी भरला आहे. खान सरांनी आपल्या हजारो बहिणींचे आभार मानले आहेत.

Video : खान सरांनी केला रेकॉर्ड, तब्बल इतक्या बहिणींनी बांधली राखी, आकडा पहाल तर चक्कर येईल
khan sirImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 9:54 PM

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : देशभरात रक्षाबंधनाचा सण हर्षोउल्हासात साजरा केला जात आहे. भावा बहिणीच्या अतुट नात्याचा हा पवित्र सण दरवर्षी नारळी पोर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला बहिण भावाला राखी बांधत आपल्या संरक्षणाची हमी घेते असते. देशभरातील अनेक नेत्यांनी रक्षाबंधनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता स्पर्धा परिक्षांचे क्लासेस चालविणारे आणि तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेले खान सर यांना त्यांच्या क्लासच्या विद्यार्थीनींनी इतक्या राख्या बांधल्या आहेत की एक अनोखा विक्रमच झाला आहे.

खान सरांनी यासंदर्भात त्यांच्या युट्युब चॅनलवर याची माहीती दिली आहे. आपल्या शिकविण्याच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले खान सर यांचा हात अक्षरश: राख्यांनी भरला आहे. खान सरांनी आपल्या हजारो बहिणींचे आभार मानले आहेत. व्हिडीओमध्ये खान सर बहिणींना शिक्षणाचे महत्व सांगताना दिसत आहेत. मुलींनी शिक्षण घेतले तरच संपूर्ण कुटुंबाचा, समाजाचा पर्यायाने देशाच फायदा होतो असे खान सर सांगत आहेत.

खान सरांचा हाच तो व्हिडीओ पाहा –

सोहळा अडीच तास सुरु होता

या व्हिडीओत खान सरांना सात हजार मुलींनी राखी बांधली आहे. खान सरांनी त्यांचे आभार मानले आहेत. हा सोहळा अडीच तास सुरु होता. खान सरांना बहिण नसल्याने त्यांना त्यांच्या विद्यार्थींनीनी राखी बांधली. यावेळी इतकी गर्दी उसळली की गर्दीला आवरताना उपस्थितांना नाकीनऊ आले. खान सर हे युपीएससी आणि इतर सरकारी नोकरी संदर्भातील स्पर्धा परीक्षांचे क्लासेस चालवित असून त्यांच्या क्लासला खूपच पसंत केले जात असते. खान सरांना कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये देखील आमंत्रित करण्यात आले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.