तिने नवरा हरवल्याची कम्प्लेंट पोलीसांना केली होती, आठ महिन्यानंतर तो घरातच सापडला
ख्रिसमस जवळ आल्याने ख्रिसमस ट्री लावण्यासाठी काही डेकोरेशनच्या वस्तू मिळतात का ते पहाण्यासाठी शोधाशोध केली तर मला हे सापडले
वॉशिग्टन डीसी : एखादी आवडती व्यक्ती नाहीशी झाली तर आपल्या तिच्या वाचून राहवत नाही. आणि ती जर रक्त्याच्या नात्यातील असेल तर एकही दिवस त्या व्यक्तीच्या आठवणी वाचून आपण राहू शकत नाही. उत्तर-पूर्व-मध्य अमेरिकेत एक विचित्र घटना घडली आहे. जे कळल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. एका महिलेचा पती हरवल्याची तक्रार तिने केल्यानंतर तो सापडच नव्हता, पोलिसांनीही हात ठेकले, अखेर आठ महिन्यानंतर कळले तिच्या वॉर्डरोबमध्येच तो होता !
जेनिफर मेइडगे यांनी त्यांचा पती नाहीसा झाल्याची तक्रार गेल्यावर्षी 27 एप्रिल रोजी केली होती. महिलेची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, परंतू तपास पुढे सरकलाच नाही. पोलिसांनी महिल्याच्या घराची तपासणी देखील केली होती, परंतू काहीच उपयोग झाला नाही. आपला नवरा काही परत येत नाही असे समजून आठ महिने झाले तरी पोलिसांनी काहीच सापडले नाही, त्यामुळे कंटाळून पोलिसांनी नाद सोडून दिला.
ख्रिसमस जवळ आल्याने डेकोरेशन करण्यासाठी वस्तू आणण्याची घरोघरी घाई चालली होती. त्यामुळे जेनिफर यांनी काही कॅश शोधण्यासाठी तिचा वॉर्ड रोब उघडला तर दुर्गंधी पसरली. तिने पोलिसांना कॉल केला. पोलीस घरात आले तर शरीर कुजल्याचा वास पसरला होता. मिस्टर सापडले पण त्यांचे शरीर शुष्क होऊन त्याची अक्षरश: ममी झाली होती. पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी बॉडी पाठवली. मिस्टर मेइडगे यांनी आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
कारच्या चाव्या आणि वॉलेट अजूनही तेथेच
आपण ख्रिसमस जवळ आल्याने ख्रिसमस ट्री लावण्यासाठी काही डेकोरेशनच्या वस्तू मिळतात का ते पहाण्यासाठी शोधाशोध केली तर मला हे सापडले अशी प्रतिक्रीया जेनिफर यांनी ‘दि सेंट लुईस पोस्ट डीस्पॅच’ या नियतकालिकाला दिली. त्याने आत्महत्या केली आहे. जेनिफर यांचे त्यांच्या नवऱ्याशी शेवटचे संभाषण त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली त्याच्या आदल्या दिवशी झाले होते. त्याने त्या दिवशी आपल्या कॉल करून कळविले होते की आज ते कामावरून लवकर येणार आहेत. त्या घरी आल्या तेव्हा त्यांचा पती घरी नव्हता. परंतू त्यांची कार घरात पार्क केली होती. आणि कारच्या चाव्या आणि वॉलेट अजूनही तेथेच आहे. पोलीसांना यात काही कट वगैरे वाटत नाही, त्यांनी ही फाईल बंद केली आहे.