खोटं काय म्हणता राव… नवरा गेला उडत, ती एकटीच गेली हनीमूनला; कुठे घडलं हे?
त्यानंतर ती मनातून प्रचंड दु:खी झाली होती. ती सर्व इव्हेंट रद्द करणार होती. नंतर तिने विचार बदलला की आपण वराशिवायच लग्नं केलं तर काय मजा येईल मग तिने सगळ्यांना निमंत्रितांना कळविले की आपण आता पार्टी साजरी करुया....
विवाह म्हणजे दोन प्रेमी जीवांचे मिलन असते. असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात. या दोन जीवांच्या आड जो कोणी येतो त्याला पायी तुडवून हे जीव पुढे जातात. म्हणतात पण मियां बिवी राजी तो क्या करेगा काजी, परंतू आपण अनेक विवाह पाहीले असतील, परंतू वरांशिवाय लग्न झालेले कधी ऐकलंय का ? ब्रिटनमध्ये असा अनोखा विवाह झाला आहे. ज्यात नवरोबा नव्हताच,वास्तविक मुलीच्या लग्नाआधीच तिच्या वागदत्त वराने चिटींग केली. मग काय ? वधूने थेट लग्न तोडून टाकलं. परंतू वेडिंग इव्हेंट आणि हनीमून ट्रिपही कॅन्सल झाली नाही. त्यावर तब्बल 38 लाख खर्च करुन टाकले.
‘द सन’ च्या बातमीनुसार, हे अजब- गजब लग्न नॉटिंघमशायर मॅन्सफिल्डमध्ये झाले. 31 वर्षीय लिंडसे स्लेटर आणि तिचा एक्स वागदत्त वर हे एकमेकांना एक तपाहून अधिक काळ डेट करीत होते. याच महिन्यात 17 ऑगस्ट रोजी त्यांनी विवाह बंधनात अडतण्याचा निर्णय घेतला, परंतू सगळे काही सुरळीत सुरु असताना त्यांचा विवाह मोडला. कारण लिंडसेच्या होणाऱ्या नवऱ्याचे एक प्रकरण लिंडसेला कळले. आणि त्याने कबूलीही दिली की तो सध्या एका दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडला आहे. त्यानंतर लिंडसे मनातून प्रचंड दु:खी झाली. त्यानंतर ती सर्व इव्हेंट रद्द करणार होती. नंतर तिने विचार बदलला की आपण वराशिवायच लग्नं केलं तर.. आणि या दिवसाला ‘फ्रीडम डे’ म्हणून सेलिब्रेट केले तर मग काय ? कारण लिंडसेने लग्न आणि हनीमूनच्या तयारीसाठी 46 हजार डॉलर (38 लाख रुपयांहून अधिक) खर्च केले होते. त्यामुळे हे पैसे वाया जाऊ न देण्यासाठी आपल्या कुटुंब आणि मित्रपरीवारासह हा दिवस साजरा करायचे ठरविले. मग तिने मस्त प्लान केला आणि यात तिला तिच्या बहिणीने देखील मदत केली.
निर्णय घेणे सोपे नव्हते ?
लिंडसेने सर्व पाहूण्यांना आपल्या तुटलेल्या लग्नाची माहिती दिली आणि त्यांना सांगितले की तुम्ही तरीही या ‘फ्रीडम पार्टी’ ला येऊ शकता. त्यानंतर वर नसलेल्या या लग्नसोहळ्यात सत्तर पाहुणे हजर झाले.यात खाणे- पिणे सोबत गाऊन नाचून हा सोहळा साजरा केला. लिंडसे तिच्या एका मैत्रिणीसह सात दिवस हनीमून ट्रीपला ग्रीसला केला.पेशाने वकील असलेल्या लिंडसे हीचे म्हणणे आहे की अशा प्रकारचा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतू लिंडसेने दाखवून दिले की जीवनात सर्वजण कठीण परिस्थितीचा सामना करीत असतात.तर आम्ही आमच्या आनंदाला आणि स्वातंत्र्याला प्राथमिकता द्यायला हवी !