KBC मध्ये एक कोटी जिंकणारा तरुण राहतो भाड्याच्या घरात, एक कोटीचे त्याने काय केले?

मागच्या सिजनमध्ये एक कोटी जिंकणारा साहिल अहिरवार भाड्याच्या घरात राहतो. एक कोटी जिंकल्यानंतर त्याने याचे केले तरी काय?

KBC मध्ये एक कोटी जिंकणारा तरुण राहतो भाड्याच्या घरात, एक कोटीचे त्याने काय केले?
साहिल अहिरवार Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 8:01 PM

मुंबई, 2021 मध्ये कौन बनेगा करोडपती (KBC) च्या शेवटच्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्याकडून एक कोटीचा धनादेश मिळालेला करोडपती विजेता साहिल आदित्य अहिरवार (Sahil Ahirwar) सध्या सागर येथे भाड्याच्या घरात राहत आहे. त्याचे घर छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर येथे असले तरी परिस्थितीमुळे त्याला सागर येथील एका छोट्याशा घरात दोन-तीन मित्रांसह राहावे लागत आहे. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये करोडपती बनलेला स्पर्धक अशा स्थितीत का आहे? शोमध्ये जिंकलेल्या पैशाचे त्याने काय केले? यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत काही सुधारणा झाली का?

21 ऑक्टोबर 2021 रोजी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी KBC मध्ये करोडपती झालेल्या मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील साहिल आदित्य अहिरवारची कहाणी. आजकाल, साहिल सागरच्या एका खोलीच्या घरात राहून आपले भविष्य घडवण्यासाठी धडपडत आहे. केबीसीमध्ये एक कोटी जिंकल्यानंतरही त्याच्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही.

साहिल करतोय UPSC ची तयारी?

आई-वडील आणि स्वामी विवेकानंद हे साहिलचे आदर्श आहेत. महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनीही त्यांना प्रेरणा दिली. सागरच्या हरिसिंग गौर विद्यापीठातून यावर्षी बीए केलेला साहिल आदित्य अहिरवार सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. साहिल सांगतो की यूपीएससी पास करून आयएएस होण्याचे त्याचे लक्ष्य आहे. कमी वयामुळे तो 2023 मध्ये UPSC चा पहिला अटेम्प देऊ शकला नव्हता.

हे सुद्धा वाचा

एक कोटी रुपयांचे त्याने काय केले?

साहिलने KBC मध्ये जिंकलेल्या एक कोटीचे काय केले? या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणतो, “मी कुठलाही खर्च केला नाही. जिंकलेल्या पैशातून मी लवकुश नगरमध्ये माझ्या आई-वडिलांसाठी पक्के घर बांधले आहे.” यासोबतच साहिल अहिरवार याने गुंतवणुकीसाठी काही प्लॉट घेतले आणि सरकारी रोखे तसेच  म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले. साहिलला बक्षीस म्हणून ह्युंदाई आय-20 कार देखील मिळाली होती, जी लक्षवकुश नगरमध्ये कुटुंबाकडे आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.