Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidhi Viral Video : त्या आदिवासी तरुणाचे मुख्यमंत्र्यांनी पाय धुतले, त्याची माफी मागितली, तरी सुध्दा…

MP News : मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आदिवासी तरुणावरती बीजेपीच्या नेत्याने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला होता. त्या तरुणाचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला आहे.

Sidhi Viral Video : त्या आदिवासी तरुणाचे मुख्यमंत्र्यांनी पाय धुतले, त्याची माफी मागितली, तरी सुध्दा...
Shivraj Singh ChouhanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 1:54 PM

मुंबई : मध्यप्रदेश (MP News) राज्यात एक घटना घडली होती, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (VIDEO VIRAL) झाल्यानंतर त्याची चर्चा सगळीकडं होती. ही घटना राजधानी भोपाळपर्यंत (BHOPAL NEWS) पोहोचली होती. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली, त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी त्या आदिवासी युवकाचे पाय धुतले. त्याची आरती केली, त्याचबरोबर माफी मागितली आणि म्हणाले ही घटना मन दुखावणारी आहे. त्यावेळी त्या पीडित युवकासोबत भाजपचे आमदार केदार शुक्ला आणि पक्षाचे अन्य नेते सुध्दा होते.

पाय धुतल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरती लिहीलं आहे की, ‘हा व्हिडीओ तुम्हाला याच्यासाठी दाखवत आहे की, मी मुख्यमंत्री असल्यामुळे इथली जनता माझ्यासाठी देव आहे. आपल्या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान हा माझा सन्मान आहे.’

मंगळवारी सीधी जिल्ह्यातून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये भाजपचा नेता प्रवेश शुक्ला हा नशेच्या भरात एका आदिवाशी तरुणाच्या अंगावर लघवी केली होती. त्यावेळी त्या नेत्याच्या हातात सिगारेट सुध्दा होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा आदेश सुध्दा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी प्रवेश शुक्ला या ताब्यात घेतलं आहे. बुधवारी त्याच्या घरावरती बुलडोजर चालवला आहे.

त्या प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. विरोधी पक्ष नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, मायावती, अखिलेश यादव यांनी सुध्दा या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी रात्री पीडित आदिवासी यांच्या घरासमोर युवक काँग्रेस नेता अजय सिंह यांनी आंदोलन केलं होतं.

या प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ पुर्णपणे सक्रीय झाले आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी मीडियाला सांगितलं की, आदिवासी अत्याचार प्रकरणाता मध्यप्रदेश सध्या एक नंबरला आहे. या घटनेमुळे मध्यप्रदेश राज्य पूर्णपणे लाज आणली आहे. त्या आरोपीला सगळ्यात कडक शिक्षा व्हायला हवी.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.