Shocking : …आणि अचानक कोसळतो पूल, हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल
आज जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये तुम्हाला थेट मृत्यूचं दृश्य दिसणार आहे. व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ ब्राझील(Brazil)चा आहे.
अपघाताचे व्हिडिओ (Video) आपण अनेकदा पाहत असतो. पण आज जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये तुम्हाला थेट मृत्यूचं दृश्य दिसणार आहे. व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ ब्राझील(Brazil)चा आहे.
व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, की तुम्ही आजपर्यंत इतकं भयानक दृश्य पाहिलं नसेल. हा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही एक पूल पाहू शकता. हा पूल एका नदीवर बांधला आहे. व्हिडिओ पाहून परिसरात खूप पाऊस झाल्याचं दिसतंय.
क्षणात होत्याचं नव्हतं
काही लोक पुलावरून पायी जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. त्याचवेळी जोरदार प्रवाहामुळे पुलाखालून पाणी वाहत आहे. पुलावरून ज्या प्रकारे लोकांची ये-जा सुरू आहे, ते पाहून काही सेकंदात काय होणार, याची कुणाला कल्पनाही येणार नाही. अचानक पूल तुटतो आणि पाण्यात बुडायला लागतो.
सर्व पाहून जातं
व्हिडिओमध्ये काही लहान मुलांसह अनेक लोक वेगानं वाहणाऱ्या पाण्यात काही क्षणात गायब झाल्याचं तुम्ही पाहू शकता. एक माणूस रस्त्याचा कोपरा पकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसतंय. पण धक्का इतका जोरदार होता, की ती व्यक्ती वाहून जाते. हे सर्व इतक्या वेगानं घडतं, की कोणीही मदतीसाठी येण्यापूर्वीच पुलावरून चालणारे लोक वाहून जातात.
View this post on Instagram
इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर
memewalanews नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स धक्कादायक कमेंट्स करत आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की आयुष्यात कधी, कुठे, काय होईल हे माहीत नाही.’ त्याचवेळी आणखी एका यूझरनं आयुष्याचा भरवसा नाही’ असं म्हटलंय.