असं म्हणतात, की देव सर्वत्र पोहोचू शकत नाही, म्हणून त्यानं आईची निर्मिती केली. कारण आई आपल्या मुलाला संकटातून वाचवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडू शकते. पण आईच आपल्या मुलाच्या जीवाची शत्रू झाली तर? उझबेकिस्तान (Uzbekistan)च्या ताश्कंद(Tashkent)मधून असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथं एक आई आपल्या बाळाला फिरण्याच्या बहाण्यानं प्राणीसंग्रहालया(Zoo park)त पोहोचतं आणि नंतर तिच्या निरागस चिमुरडीला अस्वला(Bear)च्या घेरात मरायला ढकलते. हा संपूर्ण प्रकार तिथं असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सर्वजण या कलियुगी आईला खूप शिव्या देत आहेत. सुदैवानं, प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी वेळेत अस्वलाच्या ठिकाणी पोहोचले आणि मुलीला सुखरूप बाहेर काढलं.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी ताश्कंदमधील एक 3 वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आली होती. यानंतर त्याची आई अस्वलाला दाखवण्यासाठी त्याच्या घराच्या रेलिंगजवळ उभी राहिली. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मात्र काही मिनिटांनंतर तिथं अशी घटना घडली, जी पाहून उपस्थित सर्वजण थक्क झाले. अस्वल दाखविण्याच्या बहाण्यानं महिलेनं तिच्या मुलाला रेलिंगवरून ढकलून दिलं. याचं एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला मुलाला ढकलताना दिसत आहे.
कोणतीही इजा नाही
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलगी आवारात पडताच अस्वल सक्रिय होतं. यानंतर लगेचच मुलीकडे धाव जातं. जुजू नावाच्या अस्वलानं मुलीला कोणतीही इजा केली नाही, ही एक दिलासादायक बाबच म्हणावी लागेल. अस्वलानं हुंगताच तिला सोडून दिलं. दुसरीकडे मुलगी पडल्याचं वृत्त मिळताच प्राणीसंग्रहालयाचे कर्मचारी तत्काळ अस्वलाच्या परिसरात धावले. यानंतर त्यांनी मुलीला तिथून सुखरूप बाहेर काढलं. या घटनेत मुलीला किरकोळ दुखापत झाली असली तरी ती खूपच घाबरलेली आहे.
मुद्दाम ढककलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिलेवर मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यामध्ये ती दोषी आढळल्यास तिला किमान 15 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याच वेळी, प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे, की या महिलेनं मुलीला मुद्दाम अस्वलाच्या ठिकाणी ढककलं होतं. याशिवाय तिथं उपस्थित लोकांनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यावेळी आम्ही महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तिनं आपल्या मुलीला अस्वलाच्या गोठ्यात फेकून दिलं होतं, असं लोकांचं म्हणणं आहे. मात्र, महिलेनं असं का केलं, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.