धक्कादायक, या कारणाने पृथ्वीचा कल झुकला, जलवायू परिवर्तनाने नैसर्गिक संकटात होणार वाढ ?

आतापर्यंत पृथ्वीच्या अक्षाच्या परिवर्तनास भूजल जबाबदार असल्याचे उघडकीस आले नव्हते. या आधी ग्लेशियर आणि अंटार्टिका येथील बर्फाचे वितळणे यालाच समुद्राची पातळी वाढण्याला आणि जलवायू परिवर्तनास जबाबदार समजले जात होते.

धक्कादायक, या कारणाने पृथ्वीचा कल झुकला, जलवायू परिवर्तनाने नैसर्गिक संकटात होणार वाढ ?
water wellImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 2:28 PM

दिल्ली : पाण्याच्या तहानेमुळे मानवाने पृथ्वीच्या पोटात अनेक बोअर आणि विहीरी खणल्याने आपली पृथ्वी तिच्या कलेवर थोडी झुकली असल्याचे धक्कादायक संशोधन पुढे आल्याने जगभरातील पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पृथ्वीचा कल थोडा झुकला असल्याने आणि तिचे सूर्यापासूनचे अंतर बदलत असल्याने आपल्या पृथ्वीवर ऋतुंमध्ये बदल होत असतात. परंतू वाढत्या लोकसंख्येची पाण्याची तहान भागविण्यासाठी भूजल पंपिंगसाठी पृथ्वीच्या पोटातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसल्याने पृथ्वीचा कल थोडा झुकल्याचे संशोधनात उघडकीस आले आहे.

पृ्थ्वी आपल्या अक्षावर साडे तेवीस अंश झुकलेली असते. त्यामुळे पृथ्वीवर ऋतूंमध्ये बदल होत असतात. सूर्यापासूनचे पृथ्वीचे असलेले अंतर कमी जास्त होत असून त्याकारणा पृथ्वीवर पाण्याची उपलब्धता आहे. ही देणगी ज्ञात असलेल्या अन्य कोणत्याही ग्रहावर नसल्याने पृथ्वीवर मानवी आणि सजीव प्राणी आहेत. आता एका संशोधनात पृथ्वीच्या पोटात साल 1993 ते 2010 दरम्यान पाणी उपसण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोअरवेल आणि विहीरींसाठी पम्पिंग केल्याने पृथ्वीचा पृथ्वीचा कल 80 सेंटीमीटरने पूर्व दिशेला दिशेला झुकल्याने पृथ्वीच्या जलवायूवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ जर्नलमधील संशोधन

‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, या काळात पश्चिम उत्तर अमेरिका आणि वायव्य भारतात पाण्याचे सर्वाधिक पुनर्वितरण झाले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या अंदाजानूसार मानवाने 2,150 गिगाटन भूजलाचे शोषण केले आहे. ते 1993 ते 2010 पर्यंत समुद्राच्या पातळीच्या सहा मिलिमीटरपेक्षा जास्त वाढी एवढी असल्याचे म्हटले जात आहे. परंतू या अंदाजाचा पुरावा जमा करणे कठीण आहे. कारण अशी मोजणी करण्याची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही. अनुमानाची पडताळणी करणे कठीण असल्याचेही शास्रज्ञांचे म्हणणे आहे.

पृथ्वी आपल्या अक्षावर थोडी आणखी झुकली

या अभ्यासगटाचे नेतृत्व करणाऱ्या कोरियातील सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीचे भूभौतिकशास्त्रज्ञ की-वेन सीओ यांनी म्हटले आहे की पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कल कोणत्याही बदलाला कारणीभूत आहे. भूजलाच्या उपशामुळे पाण्याचे वितरण समान होत त्याचा परीणाम पृथ्वीच्या कलण्यावर झाला आहे. जल उपशामुळे पृथ्वी आपल्या अक्षावर थोडी आणखी झुकली आहे.

वर्षांत अनेक मीटरने सरकतो पृथ्वीचा कल

रोटेशनल पोल म्हणजे परिभ्रमण करताना पृ्थ्वीचा कल किंवा अक्ष एका वर्षांत अनेक मीटरने सरकतो असे संशोधकांनी म्हटले आहे. भूजल पंपिंगमुळे होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलाचा धोका नाही. तथापि, तरीही भूगर्भीय वेळेच्या प्रमाणानुसार, पृथ्वीचा अक्ष झुकल्यास त्याचा हवामानावर परिणाम होऊ शकतो असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

नवीन माहीती उघड

अभ्यासकांनी म्हटले आहे की, पृ्थ्वीच्या अक्षाला बदलण्याच्या पाण्याच्या क्षमतेचा अंदाज शास्रज्ञांना साल 2016 मध्ये आला होता. आतापर्यंत पृथ्वीच्या अक्षाच्या परिवर्तनास भूजल जबाबदार असल्याचे उघडकीस आले नव्हते. या आधी ग्लेशियर आणि अंटार्टीका येथील बर्फाचे वितळणे यालाच समुद्राची पातळी वाढण्याला आणि जलवायू परिवर्तनास जबाबदार समजले जात होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.