शॉपिंग (Shopping) हा आपल्या सर्वांचाच आवडता उद्योग. कोणाला मोठ्या मॉलमधून शॉपिंग करायला आवडतं तर कोणाला एखाद्या शोरूममधून तर कोणाला छोट्या दुकानातून… काही जणांना पैसे वाचवायचे असतात. म्हणून मग ते जिथं कुठं ऑफर असेल अशी ठिकाणं शोधत असतात. काही जणांना मात्र शॉपिंग करायची नसते. पण उगीच एखाद्या दुकानात जाऊन विचारपूस करणं किंवा एखाद्या भल्यामोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जाऊन विविध वस्तू पाहण्याचा छंदच असतो. त्यामुळे दुकानदाराला किंवा तिथला जो कोणी विक्रेता असतो, त्याला विनाकारण आपला वेळ वाया घालवावा लागतो. असाच एका रिकामटेकड्या ग्राहकांचा (Customers) फटका मॉलमधल्या (Mall) कर्मचाऱ्याला बसला आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. यातही दोघेजण एका मॉलमध्ये घुसतात आणि विक्रेत्याचा टाइमपास करतात. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून तो आता व्हायरल झालाय.
व्हिडिओमध्ये आई आणि एक तरूण मुलगा दाखवलाय. ते दोघे एका भांड्याच्या मोठ्या मॉलसारख्याच एका दुकानात जातात. तिथं त्यांना हव्या असलेल्या वस्तू सेल्समनला विचारतात. मग एक एक वस्तू हा तरूण मुलगा पाहतो आणि आपल्या आईला विचारतो. मग तीही हात दाखवून चांगल्या असल्याचे इशारे करते. मग सेल्समनला वाटतं पार्टी मोठी आहे. तो त्यांच्यासाठी खायलाही मागवतो. दोघेही भरपेट जेवण करतात. नंतर सेल्समनला टीव्ही आहे का, असं विचारतात. नंतरची धमाल व्हिडिओमध्ये पाहण्यासारखीच आहे.
यूट्यूबवर सलमान नोमान (Salman Noman) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 22 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळत आहे. 6.7 मिलियनहून अधिक व्ह्यूज काही तासांत या व्हिडिओला मिळाले आहेत. ‘Kabhi aisa kiya hai?’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. कमेंट्समध्ये अनेकांनी हसण्याचे इमोजी दिले आहेत. (Video courtesy – Salman Noman)