viral Video : आकाशात मोठा पक्षी विमानाला धडकला, विंडशिल्ड तोडली, पायलटने मग असे केले..

व्हायरल व्हिडीओ पायलटच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसत आहेत. ते डाग कोणाचे आहेत ? हे  डाग पक्षाचे आहेत की पायलटचे ?

viral Video : आकाशात मोठा पक्षी विमानाला धडकला, विंडशिल्ड तोडली, पायलटने मग असे केले..
bird hit planeImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 3:52 PM

क्वेटो : विमानाला जर पक्षाने धडक दिली तर अनेकदा विमानाला सुखरूपपणे उतरावे लागते. पक्षाच्या धडकेने इंजिनात बिघाड झाल्याने विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करावे लागल्याच्या घटना तुम्ही वृत्तपत्रात अनेकदा वाचल्या असतील. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. ज्यात एक महाकाय पक्षी विमानाला धडकल्याने विमानाच्या पायलट समोरील काच तोडून तो आत शिरल्याची घटना त्यात दिसत आहे. हा व्हिडीओत पायलटची अवस्था बिकट दिसत आहे. त्याच्या तोंडावर रक्ताचे शिंतोडे दिसत आहेत. परंतू अशाही अवस्थेत त्याने विमानाला सुखरुप लॅंडींग केले आहे.

या भयानक व्हिडीओला पोस्ट करणाऱ्या न्यूज एजन्सीनूसार ही घटना इक्वाडोर मध्ये घडली आहे. रशिया टूडेने दिलेल्या बातमीनूसार या विमानाला पायलटने सुखरुपपणे लॅंडींग केले आहे. व्हिडीओतील पायलटची ओळख पटली असून त्याचे नाव एरीयल वॅलेंट आहे. एका ट्वीटरने दिलेल्या बातमीनूसार इक्वाडोरच्या लॉस रियोस प्रांतातील एका विशाल पक्षाने विमानाच्या विंडशील्डला धडक दिल्यानंतर पायलटने आपल्या विमानाला सुखरुपपणे उतरवले आहे. एरीयल यांना सुदैवाने काही गंभीर दुखापत झालेली नाही.

या व्हिडीओला ट्वीटरवर शेअर करण्यात आले असून त्यावर अनेक प्रतिक्रीया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नशीबवान पायलट आहे. माझ्या परिचितातील एका पायलटला अशा अपघातात आपले डोळे गमवावे लागले होते. तर अन्य एका युजरने म्हटले आहे की, मी रोड किल बाबत एकलेले आहे परंतू एअरकिलबद्दल कधी ऐकलेले नाही किंवा पाहीलेले नाही. तर तिसऱ्याने लिहीले आहे की, या पायलटच्या धैर्याला आणि समंजसपणाची तारीफ करायला हवी. हा खरोखरच लिजेंड आहे.

पायलटच्या चेहऱ्यावरील रक्त कोणाचे ?

व्हायरल व्हिडीओ पायलटच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसत आहेत. ते डाग कोणाचे आहेत ? हे  डाग पक्षाचे आहेत की पायलटचे ? याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. अशा तणावाच्या स्थितीत पायलटला नेमके काय करायचे असते त्याचे प्रशिक्षण सुरुवातीलाच दिलेले असते असे एका इन्स्ट्रक्टरने म्हटले आहे. या पक्षाचे नाव काही जणांनी एंडीयन कोंडोर असल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे. या पक्षाच्या पंखांची लांबी नऊ फुटापर्यंत असते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.