‘मोदी साब…’ काश्मिरी चिमुरडीची हाक शासनाने ऐकली, होमवर्कबाबत महत्त्वाचे आदेश

जम्मू-काश्मीरमधील चिमुरडीने अनेक तास चालणाऱ्या ऑनलाईन वर्ग आणि होमवर्कबद्दल थेट पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली होती (Kashmiri Girl complaints Homework Narendra Modi)

'मोदी साब...' काश्मिरी चिमुरडीची हाक शासनाने ऐकली, होमवर्कबाबत महत्त्वाचे आदेश
काश्मिरी मुलीची मोदींना हाक
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 1:12 PM

श्रीनगर : “मोदी साब… लहान मुलांवर कामाचा इतका बोजा कशासाठी?” असा निरागस प्रश्न विचारणाऱ्या सहा वर्षांच्या काश्मिरी चिमुरडीची हाक (Jammu Kashmir Girl) अवघ्या काही तासात शासनाने ऐकली. जम्मू काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी शालेय शिक्षण विभागाला या प्रश्नी लक्ष घालण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. ट्विटरवर पोस्ट झालेली ही व्हिडीओ क्लिप 57 हजारांहून अधिक नेटिझन्सनी पाहिली असून, 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे होमवर्कची तक्रार करत ही चिमुरडी चर्चेचा विषय ठरली होती. (Six Years old Kashmiri Girl complaints about Homework in Video to PM Narendra Modi Jammu Kashmir LG responds)

“खूपच लाघवी तक्रार. शाळकरी मुलांवरील गृहपाठाचे ओझे कमी करण्यासाठी 48 तासांत नवे धोरण निश्चित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. बालपणातील निरागसता ही देवाची देणगी आहे आणि त्यांचे दिवस चैतन्यशील, आणि आनंदाने भरले जावेत” असे ट्वीट जम्मू काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी केले आहे.

काय आहे व्हिडीओ?

जम्मू-काश्मीरमधील संबंधित चिमुरडी काही तास चालणाऱ्या ऑनलाईन वर्गाबद्दल नाराज आहे. औरंगजेब नक्षबंदीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 6 वर्षांच्या काश्मिरी मुलीने शाळेतून ऑनलाईन वर्ग आणि गृहपाठ याबद्दल आपली व्यथा मांडल्याचं तिने लिहिलं आहे. (Kashmiri Girl complaints Homework Narendra Modi)

चिमुरडीने व्हिडीओमध्ये नेमकं काय सांगितलं?

एक मिनिट 11 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ही चिमुकली सांगते की, तिचा ऑनलाईन वर्ग सकाळी 10 वाजता सुरु होतो आणि दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहतो. “मोदी साब अस्सलामु अलैकुम, छोट्या मुलांवर शिक्षक एवढं कामाचं ओझं कशासाठी? इंग्रजी, गणित, उर्दू आणि ईव्हीएस हे विषय शिकवले जातात. त्यानंतर संगणक वर्ग देखील असतो. इतकं जास्त काम असतं मोठ्या मुलांसाठी. छोट्या मुलांवर कामाचा एवढा बोजा कशासाठी आहे मोदी साब. आता काय करायचं” असा निरागस सवाल ती विचारते.

संबंधित बातम्या

VIDEO| 6 वर्षांच्या मुलीने विचारले, मोदी साहेब; मुलांवर कामाचं एवढं ओझं का?; व्हिडीओ व्हायरल

Video | जंगलाच्या राजाचा राणीसोबत विहार, सिंहाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्

(Six Years old Kashmiri Girl complaints about Homework in Video to PM Narendra Modi Jammu Kashmir LG responds)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.