Video | लॉलीपॉप खायची झाली इच्छा, मुलाने असं डोकं लावलं की सगळे म्हणाले, ‘जहाँपणा तुसी ग्रेट हो’ !
लहान मुलगा शाळेत प्रार्थना सुरु असताना लॉलीपॉप चवीने खातोय. लॉलीपॉप खाण्यासाठी त्याने वापरलेली युक्तीसुद्धा चर्चेचा विषय ठऱतेय. (small boy eating lollipop school prayer video)
मुंबई : सोशल मीडियावर लहान मुलांच्या खोडकरपणाचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. त्याचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. लगान मुलांचं लहानपण किंवा खोडकरपणाचे कित्येक व्हिडीओ रोज अपलोड होतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला चांगलेच आवडून जातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एक लहान मुलगा शाळेत प्रार्थना सुरु असताना लॉलीपॉप चवीने खातोय. लॉलीपॉप खाण्यासाठी त्याने वापरलेली युक्तीसुद्धा चर्चेचा विषय ठऱतेय. (small boy eating lollipop in ongoing school prayer video goes viral)
अनेकजणांना आपलं लहानपण आवडतं. लहानपणीच्या आठवणीत रममाण होणे अनेकांना आवडतं. आजच्या धावपळीच्या जगात आपल्या लहानपणाच्या आढवणींना उजाळा देणारी गोष्ट घडली की आपल्या आनंदाला परावार उरत नाही. कित्येकांच्या लहानपणीच्या आठवणींना पुन्हा जागं करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.
लहान मुलगा लॉलीपॉप खातानाचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ :
Relatable. Isn’t it? ? pic.twitter.com/5hTEcjVSEW
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 17, 2021
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलागा मस्तपैकी लॉलीपॉप खातोय. विशेष म्हणजे शाळेमध्ये प्रार्थना सुरु असताना डोळे बंद करुन तो मजेत लॉलीपॉपचा आनंद घेताना दिसतोय. आयएएस अधिकारी अवनिश शरन यांनी हा व्हिडीओला शेअर केलं आहे. यामध्ये शाळेमध्ये प्रार्थना सुरु असल्याचं दिसतंय. सगळे छोटे विद्यार्थी हात जोडून तन्मयतेने ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना म्हणत आहेत. मात्र यामध्ये एक मुलगा हात जोडून शांतपणे डोळे मिटून लॉलीपॉप खातोय. एक ओळ प्रार्थनेची म्हणत तो मध्येच लॉलीपाल चाखतोय. त्याची प्रार्थना करण्याची पद्धत आणि लॉलीपॉप खाण्यासाठी लढवलेली युक्ती नेटकऱ्यांना चांगलीच भावतेय.
दरम्यान, लॉलिपॉप खाणाऱ्या या मुलाकडे पाहून अनेकांनी लहानपण पुन्हा जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी या मुलाच्या निरागसतेचे गोडवे गायले आहेत. आयएएस अधिकारी अवनिश शरन यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणत शेअर केलं जात आहे.
इतर बातम्या :
Video | मम्मी-पप्पाच्या लग्नात मुलीचे गोड नखरे, रडून-रडून जिंकलं सर्वांच मन, एकदा व्हिडीओ पाहाच
Video | बापरे ! केस कापण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा वापर, व्हिडीओ एकदा पाहाच
VIDEO | लहान भाऊ चिडला, मोठ्या भावाने काय केलं?, जबाबदारी शिकवणारा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच !
(small boy eating lollipop in ongoing school prayer video goes viral)