सापाचा जन्म कसा होतो? सोशल मीडियावर Viral होतोय ‘हा’ Video
Snake video : आपल्याला ज्याची भीती वाटते अशा प्राण्यांमध्ये साप हा एक प्राणी (Animal) आहे. जन्मत:च साप भीतीदायक असतात. आजकाल सापाच्या जन्माचा (Snake Birth) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे.
Snake video : आपल्याला ज्याची भीती वाटते अशा प्राण्यांमध्ये साप हा एक प्राणी (Animal) आहे. जन्मत:च साप भीतीदायक असतात. आजकाल सापाच्या जन्माचा (Snake Birth) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने हातात सापाचे अंडे धरले आहे. या अंड्यातून सापाचे पिल्लू बाहेर पडत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही विचार करत बसाल. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल, की निसर्गाने या पृथ्वीवर किती विचित्र सृष्टी निर्माण केली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला थोडी भीतीही वाटेल. अंड्यात बसलेले सापाचे पिल्लू दुसऱ्या प्राण्याच्या पिल्लासारखे दिसते. हे पाहून तुम्हाला भयानक कोब्राची आठवण होईल. या सापाची प्रजाती तर माहीत नाही, मात्र हे अत्यंत भीतीदायक आहे.
माणसाने हातात धरले अंडे
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका व्यक्तीने हातात पिवळ्या सापाचे अंडे धरले आहे. या अंड्याच्या आत हे पिल्लू विकसित झाले आहे. व्हिडिओमध्ये साप अंडी फाडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. अंड्यातून बाहेरील जगाकडे पाहत असलेला एक छोटा पिवळा साप दिसतो. मात्र, दोन वेळा तोंड बाहेर काढल्यानंतर तो पुन्हा अंड्याच्या आत जाताना दिसतो. आता व्हिडिओ पाहू या…
View this post on Instagram
इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर
व्हिडिओमध्ये तुम्ही सापाच्या शरीरावर काळे आणि तपकिरी डाग पाहू शकता. व्हायरल व्हिडिओ snakes.empire नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक हा धक्कादायक व्हिडिओ पाहत आहेत आणि व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक लोक भीतीने प्रतिक्रिया देत आहेत, तर काही लोकांना लहान सापदेखील गोंडस वाटत आहे. साप एका वेळी 200 ते 250 अंडी घालतो, तर बहुतेक अंडी स्वतःच खातो.