‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…’ व्हिडीओ कॉलवर लेकाचं गाणं, आईला अखेरचा निरोप

तरुणाने आपल्या मरणासन्न अवस्थेतील आईसाठी गाणे गायले, असे डॉ. दीपशिखा घोष यांनी लिहिले आहे. (Son sings Song Mother)

'तेरा मुझसे है पहले का नाता कोई...' व्हिडीओ कॉलवर लेकाचं गाणं, आईला अखेरचा निरोप
फोटो - सोहम चटर्जी फेसबुक
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 2:29 PM

मुंबई : कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना आपल्या प्रियजनांना नीट अखेरचा निरोपही देता येत नाही. कोरोनावर उपचार घेणाऱ्या एका महिलेचाही दुर्दैवी अंत झाला. मात्र अखेरचा श्वास घेण्याआधी तिने लेकासोबत घालवलेले व्हर्चुअल क्षण कोणाच्या डोळ्यात पाणी आणतील. ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ हे प्रसिद्ध गाणं गात लेकाने आईला अखेरचा निरोप दिला. (Son sings Tera Mujhse Hai Pehle Ka Naata Koi Song on video call bids tearful goodbye to COVID19 infected mother)

नेमकं काय घडलं?

डॉ. दीपशिखा घोष यांनी आपल्याला आलेला अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. “माझ्या शिफ्टच्या अखेरीस मी मृत्यूशय्येवर असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल केला. आमच्या हॉस्पिटलमध्ये मी सहसा अशा गोष्टी करते, जेव्हा एखाद्या रुग्णाची किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असते. या रुग्णाच्या मुलाने माझा काही वेळ मागितला. त्यानंतर त्याने आपल्या मरणासन्न अवस्थेतील आईसाठी गाणे गायले” असे डॉ. दीपशिखा घोष यांनी लिहिले आहे.

‘तेरा मुझसे है पेहले का नाता कोई’

“त्या तरुणाने ‘तेरा मुझसे है पेहले का नाता कोई’ हे गाणं गायलं. मी तिथे फोन धरुन स्तब्ध उभे होते. त्याच्याकडे पहात होते, त्याच्या आईकडे पाहत होते आणि त्याचं गाणं ऐकत होते. माझ्या बाजूला काही नर्स येऊन शांतपणे उभ्या राहिल्या. तो गाता-गाता मध्येच रडू लागला, परंतु त्याने गाणं पूर्ण केलं. त्याने आईची खुशाली विचारली, माझे आभार मानले आणि फोन ठेवून दिला.” असं पुढे डॉक्टरांनी लिहिलं आहे.

रुग्णालयातील सगळेच थिजले

“मी आणि नर्स तिथेच उभ्या राहिलो. आम्ही आमची डोकी हलवली, आमचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. नर्स एक-एक करून त्यांच्या रुग्णांकडे गेल्या. या गाण्याची परिभाषा आमच्यासाठी बदलली आहे, किमान माझ्यासाठी तरी नक्कीच बदलली आहे. हे गाणं माझ्या दृष्टीने नेहमीच त्यांचं असेल.” असं डॉ. घोष लिहितात.

सोहम चटर्जीचा आईला अखेरचा निरोप

“त्यांच्या परवानगीने नावं सांगते, वरील उल्लेख केलेल्या व्यक्ती म्हणजे श्रीमती संघमित्रा चटर्जी आणि त्यांचा मुलगा सोहम चटर्जी आहेत. माझ्याकडून तुमचं मनापासून सांत्वन. आपण, आपला आवाज, आपली प्रतिष्ठा हाच त्यांचा वारसा आहात.” असंही डॉ. दीपशिखा घोष यांनी लिहिले आहे. (Son sings Song Mother)

सोहम चटर्जी यांनी फेसबुकवरुन तो तरुण म्हणजे आपणच असल्याचं सांगतिलं आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता जिल्ह्यात कांकुरगाची येथील अपोलो ग्लेनइगल्स रुग्णालयातील ही घटना आहे. आईने बुधवारी पहाटे आमचा निरोप घेतला, असं सोहमने सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

सासऱ्यांपाठोपाठ पतीचाही कोरोनाने मृत्यू, चीनहून पत्नीचा व्हिडीओ कॉलमधून अखेरचा निरोप

‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य, आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप

(Son sings Tera Mujhse Hai Pehle Ka Naata Koi Song on video call bids tearful goodbye to COVID19 infected mother)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...