Nature Video Viral : खारूताईचा रुद्रावतार, घेतला असा काही चावा, की सरडा कोमात!
निसर्ग (Nature) अद्भुत आहे. यामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील. गेल्या काही दिवसांत एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये एका खारी(Squirrel)नं सरडा (Chamaeleon) कच्चा चावला. एवढा शांत दिसणारा प्राणी सरड्यासारख्या एखाद्या प्राण्याला कधी चावा घेऊ शकतो, याचा विचार केला आहे का? जर नसेल, तर आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Squirrel Shocking video : निसर्ग (Nature) अद्भुत आहे. यामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. प्राणी आणि पक्षांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. तुम्हाला काही चांगले आणि काही खूप विचित्र गोष्टीही पाहायला मिळतील. निसर्गात दिसणाऱ्या या गोष्टींबाबतही अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात. गेल्या काही दिवसांत एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये एका खारी(Squirrel)नं सरडा (Chamaeleon) कच्चा चावला. खार म्हणजेच आपण तिला खारूताई म्हणतो, हा एक शांत प्राणी म्हणून ओळखला जातो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. थोडा आवाज केला तरी खार पळून जातात. एवढा शांत दिसणारा प्राणी सरड्यासारख्या एखाद्या प्राण्याला कधी चावा घेऊ शकतो, याचा विचार केला आहे का? जर नसेल, तर आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक खारूताई सरड्याला चावत आहे.
खारूताईनं सरड्याला पकडलं
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. खार आणि सरडा यांच्यात लढाई झाली. दोघेही एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. पहिल्यांदाच साप खारवर हल्ला करत असल्याचं दिसतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका खारूताईनं सरड्याला पकडलं आहे, जी आपली शिकार असल्यासारखं त्याच्यावर तुटून पडलीये. या व्हिडिओ क्लिपची सुरुवात पाहून असं वाटतं, की ती फक्त त्याला घाबरवते आहे. पण खारूताईचा रुद्रावतार पाहून असं वाटतं की त्याचा जीव घेणार. एखादं फळ जोरात कुरतडल्यासारखं ती त्याचा चावा घेते. हा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटनं शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘कलियुगात काय होईल याबद्दल सांगता येत नाही’
हा व्हिडिओ आश्चर्यकारक आहे. आपल्या प्रतिक्रियाही कमेंटमध्ये यूझर्सनी दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, की कधीकधी निसर्ग आपल्याला असं काही दाखवतो, की पाहून आपण आश्चर्यचकित होतो. तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की या कलियुगाच्या काळात कधी काय होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. याशिवाय इतर अनेक यूजर्स यावर टिप्पण्यांद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली.