Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कुडाळच्या डबलबारीत वाजलं #Srivalli! श्रोते म्हणाले, वाह बुवा एक नंबर…

Srivalli Song in Sindhudurg Double Bari : बुवांना लाल शर्टातला माणूनस 'बरोबर हां' असं मालवणीत म्हणत प्रोत्साहन देतोय. श्रीवल्ली गाणं तुम्ही बरोबर वाजवत आहात, असंच सुरु ठेवा, असं तो खुणावतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह...

Video | कुडाळच्या डबलबारीत वाजलं #Srivalli! श्रोते म्हणाले, वाह बुवा एक नंबर...
डबलबारीत वाजलं श्रीवल्ली
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 1:27 PM

सिंधुदुर्ग : कोरोनाची लाट ओसरली. तशी तळकोकणात आणखी एक लाट आली. ही लाट आहे डबलबारीची! गेल्या दोन वर्षांत डबलबारीचे सामने फार काही झाले नाहीत. कोरोनाचा फटका बसलेल्या डबरबाऱ्यांना आता पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कोकणात डबलबारी म्हटलं, की त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. टी-ट्वेन्टीच्या जमान्यात डबलबारीची क्रेझही 20-20 फॉरमॅट सारखी झाली आहे. अशाच एका डबलबारीच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियात (Double Bari Video went viral on Social Media) चर्चा आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सग्रुपमध्ये डबलबारीचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये चक्क पुष्पा द राईज सिनेमातलं (Pushpa The Rise Movie) श्रीवल्ली हे गाणं बुवांनी सादर केलंय. पायपेटीवर सूर ओळवत, शब्दांची धरपकड करत बुवांनी तर सूर आळवलेत. पण त्यांच्या सोबतच बाजूला असणाऱ्या लाल शर्टातल्या माणसानं जो श्रीवल्ली गाण्याचा (Srivalli Song) कॉन्फिडन्स दाखवलाय, त्याला तोड नाही. श्रीवल्ली सगळे रील्स एका बाजूला आणि डबलबारीत बुवांनी सादर केलेलं हे श्रीवल्लीचं वर्जन एका बाजूला… अशी चर्चा सध्या तळकोकणात रंगली आहे.

वाह.. बुवा.. एक नंबर!

डबलबारी म्हटलं की त्यात श्रोत्यांच्या फर्माईशी, सिनेमांची गाण्यांच्या चाली, या सगळ्यावर भजनं सादर करायची, लोकांची भरभरुन दाद मिळवायची, अशी परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. आता ट्रेन्डीग विषय आहे म्हटल्यावर बुवांनी पुष्पातलं गाणंही सादर करणं भागच होतं. उपस्थितांच्या आग्रहाखातर अखेर बुवांनी गाणं सादर केलं खरं… पण बुवांपेभाही जास्त लक्ष वेधून घेतलं, ते बुवांच्या बाजूला असलेल्या लाल शर्टातल्या माणसानं.

कोकणातले डायरीवाले बुवा..

कोकणात सर्रासपणे डबलबारी किंवा भजनं सादर करताना बुवा आपली एक टिपीकल वही पायपेटीसमोर ठेवून भजनं सादर करताना दिसतात. या व्हिडीओमध्येही तसंच दिसलंय. आता श्रीवल्लीचं अख्ख गाणं बुवांनी लिहून आणलं होतं की नाही, याची कल्पना नाही. पण 30 सेकंदाच्या व्हिडीओ बुवा वहीत बघूनच श्रीवल्ली गाताना दिसलेत, म्हणजे हमखास खाणं वहील लिहिलेलं असलेच, असं म्हणायला हरकत नाही!

बुवांना लाल शर्टातला माणूनस ‘बरोबर हां’ असं मालवणीत म्हणत प्रोत्साहन देतोय. श्रीवल्ली गाणं तुम्ही बरोबर वाजवत आहात, असंच सुरु ठेवा, असं तो खुणावतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहतोय. मग श्रीवल्ली गाण्याच्या एका कडव्याला सुरुवात करत वुबांनी आपला सूर करेक्ट पकडला. लाल शर्टातला माणूसही हातवारे करुन सांगू लागला. एखाद्या ऑर्केस्ट्रा मधला म्युझिक अरेंजरच जणू लाल शर्टातल्या माणसाच्या अंगात शिरला होता. यानंतर श्रीवल्लीच्या मुखड्यावर सगळ्यांची जो काही आलाप धरलाय, त्यानं माहौल बनवलाय.

BoB Capital या युट्युब चॅनेलवर 25 जानेवारीला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. इतकंच काय तर फेसबुकवरच्या अनेक मालवणी पेजेस वरुनही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोबतच कोकणातल्या व्हॉट्सऍपग्रुपवरही हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरतोय. ही डबलबारी नेमकी कुठे झाली, याची माहिती मिळू शकलेली नसली, तर व्हिडीओच्या मागे दिसणाऱ्या बॅनरमध्ये श्रीवल्ली सादर करणारे बुवा हे मात्र कुडाळमधीलच एखाद्या गावातील असल्याचं दिसून आलंय.

एकदा बघूकच व्हया! काय समजलाव?

गाववाल्यांनू, श्रीवल्लीचो आणखी एक व्हिडीओ असा… बघलास ना?

संबंधित बातम्या :

Video | जगदीश खेबुडकरांचे बोल, आशा भोसलेंचा आवाज आणि रश्मिकाची कंबर! आहे की नाही खतरा कॉम्बिनेशन?

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल

Udayanraje Bhonsle : उदयनराजे भोसले ‘पुष्पा : द राईज’वर फिदा, मित्रांसह घेतला सिनेमाचा आनंद

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.