…तर ‘अशी’ करायचा Bullet bike चोरी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पाहा Viral video
Start royal enfield bullet without key : चोरट्यांची नजर बुलेटवर असते. पण पोलीस (Police) शेवटी पोलीस असतात. कितीही अवघड असले तरी चोराला (Thief) पकडल्याशिवाय राहत नाहीत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की पोलिसांनी एका व्यक्तीला बुलेट चोरताना पकडले.
Start royal enfield bullet without key : भारतातील बहुतेक लोकांना रॉयल एनफिल्ड चालवायला आवडते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे तुम्हाला बुलेटचे चाहते दिसतील. मात्र, अशी अवजड दुचाकी चालवणे प्रत्येकाला शक्य नाही. चोरट्यांचीही नजर बुलेटवर असते. ते बुलेट घेऊन पळून जातात आणि त्यांना कोणी पकडूही शकत नाही. पण पोलीस (Police) शेवटी पोलीस असतात. कितीही अवघड असले तरी चोराला (Thief) पकडल्याशिवाय राहत नाहीत. अशा काही बातम्या रोज येत असतात. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. होय, बुलेट चोरणाऱ्याला पोलिसांनी पकडले. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसून येते की पोलिसांनी एका व्यक्तीला बुलेट चोरताना पकडले आणि नंतर त्याला सर्वांसमोर तो काय करायचा हे विचारले.
काही सेकंदात तोडतो लॉक
पोलिसांनी विचारल्यावर चोर लॉक केलेल्या उभ्या बुलेटजवळ जातो आणि काही सेकंदात लॉक तोडतो. एवढेच नाही तर तो चावीशिवाय गाडी सुरू करतो. ते बुलेटच्या हँडलजवळ असलेल्या काही तारांना कापतो, ज्यामुळे बुलेट एका किकमध्ये सुरू होते. हे पाहून तेथे उपस्थित असलेले पोलिसही अचंबित झाले.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर
चोरट्याने चावीशिवाय गाडी सुरू करताच लोक म्हणू लागले, की एक मिनिटही लागला नाही आणि त्याने गाडीचे कुलूप तोडून गाडी सुरू केली. म्हणजेच बुलेट चोरणे ही चोरासाठी मोठी गोष्ट नाही. तुम्हालाही तुमची गाडी सुरक्षित ठेवायची असेल, तर वाहनाची सुरक्षा वाढवायला हवी. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडिओ memewalanewsने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.