काय तर म्हणे बॉस… नग्नावस्थेत ऑफिसात फिरायचा; प्रसिद्ध उद्योगपतीवर सनसनाटी आरोप
प्रसिद्ध उद्योगपती ब्रायन जॉनसन यांच्यावर त्यांच्या स्टार्टअप ब्लूप्रिंटमध्ये कार्यस्थळी गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत. माजी कर्मचाऱ्यांनी जॉनसनवर नग्न फिरणे, लैंगिक टिप्पण्या करणे आणि छेडछाड करण्याचे आरोप केले आहेत. जॉनसन यांनी गुप्त कराराचा वापर करून कर्मचाऱ्यांना चूप राहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आहे.

टेक बिझनेस आणि अँटी एजिंग एक्सपेरिमेंटमुळे सतत चर्चेत असलेले प्रसिद्ध उद्योगपती ब्रायन जॉनसन यांच्या विरोधात वर्किंग प्लेसमध्ये चुकीची वर्तवणूक केल्याचा आरोप आहे. स्टार्टअप ब्लूप्रिंट ऑफिसात नग्नावस्थेत ऑफिसात फिरण्याचा आणि सहकाऱ्यांशी सेक्सुअल संवाद केल्याचा ब्रायन यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या कंपनीच्या माजी सहकाऱ्यांनी आता गोपनीयता करारालाच आव्हान दिलं आहे.
या आरोपानंतर ब्रायन जॉनसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी जॉनसनवर वर्किंग प्लेसचं वातावरण बिघडवल्याचा आरोप केला आहे. माजी कर्मचाऱ्यांच्या मते जॉनसन नेहमी कामाच्या वेळी कमी कपड्यात फिरायचे. एवढेच नव्हे तर ते त्यांच्या सेक्सुअल अॅक्टिव्हिटीजबाबत चर्चा करायचे. ब्लू प्रिंटमधील महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड करणाऱ्या गप्पा करायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अवघडल्यासारखं व्हायचं, असं न्यूयॉर्क टाईम्समध्ये म्हटलं आहे.
पब्लिक इमेजसाठी…
जॉनसन यांनी आपली पब्लिक इमेज आणि लोकांना कंट्रोल करण्याच्या गोपनीयता कराराची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. कमीत कमी तीन माजी कर्मचाऱ्यांनी नॅशनल रिलेशन्स बोर्डमध्ये तक्रार नोंदवली आहे. तसेच या कराराच्या वैधतेला आव्हानही दिलं आहे. तसेच असहमतीला दाबण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
सीक्रेट कॉन्ट्रॅक्ट करायचा
पूर्व कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधीत्व करणारे वकील मॅट ब्रुएनिग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जॉनसन या कराराचा वापर करून लोकांना चूप राहण्यास भाग पाडायचे. कराराच्या आडून कर्मचाऱ्यांच्या असहमतीला दाबण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असं मॅट यांचं म्हणणं आहे. जॉनसनची माजी पर्सनल असिस्टेंट जेमी कॉन्टेन्टो यांनीही सांगितले की, मलाही ते डॉक्युमेंट योग्य वाटले नाही. पण आपली नोकरी जाऊ नये म्हणून मजबुरीने मला सही करावी लागली.
या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. जॉनसन आणि स्टार्टअप ब्लूप्रिंटसमोर या आरोपांमुळे एक आव्हान उभं राहिलं आहे. कारण आधीच हा स्टार्टअप ब्लूप्रिंट कथितपणे आर्थिक मुद्दे आणि प्रॉडक्टच्या क्वालिटीमुळे त्रस्त झाला आहे. त्यातच आता हे प्रकरण आलं आहे. जॉनसने आपली बाजू मांडण्यासाठी आणि बचाव करून घेण्यासाठी या सीक्रेट कॉन्ट्रॅक्टचा वापर केला आहे. ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. करार स्पष्ट सीमा आणि अपेक्षा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण विश्वासाला योगायोगाचा मुलामा दिला जाऊ नये, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उत्तर काय?
मी सोशल मीडियावर न्यूड फोटो पोस्ट करत असतो. मी रात्री माझ्या इरेक्शनवर नजर ठेवून असतो. माझी टीम माझ्यासमोर मोकळ्या मनाने हेल्थवर चर्चा करते. आम्ही गंमतीशीर मीम्स बनवतो. आम्ही लोकांची लिखित रुपात माहिती घेतो. कारण लोक परेशान होऊ नयेत. आमची कोणतीच जबरदस्ती नाही, असंही त्यांनी म्हटलंय.