Death Valley : पृथ्वीवरील रहस्यमय ठिकाण असलेली अमेरिकेतील‘डेथ व्हॅली’; येथील दगड आपोआप पुढे सरकतात
या डेथ व्हॅलीतील आपोआप पुढे सरकणारे दगड जगप्रसिद्ध आहेत. हे दगड पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देतात. ही दरी समुद्रसपाटीपासून 282 फूट खोल आहे. इतकी खोल असूनही ही दरी पूर्णपणे कोरडी आहे. याठिकाणी एकेकाळी समुद्र असावा असा दावा भूगर्भशास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून खाली असून तिथे मीठही सापडले आहे. यामुळेच येथे एकेकाळी समुद्र असावा असे संशोधकांचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली : पृथ्वीतलावर अनेक रहस्यमयी ठिकाण आहेत(mysterious place on earth). या रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे ती अमेरिकेतील डेथ व्हॅली( America’s Death Valley). येथील तापमानामुळे या दरीला डेथ व्हॅली हे नाव पडले आहे . एकदा तेथील तापमान तब्बल 56.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. या दरी रहस्यमयी असण्याचे आणखी एक कारण आहे ते येथील दगड. येथील मोठ मोठे दगड आपोआप पुढे सरकतात. या प्रकारामुळे संशोधक देखील अचंबित झाले आहेत.
समुद्रसपाटीपासून 282 फूट खोल असूनही दरी पूर्णपणे कोरडी
या डेथ व्हॅलीतील आपोआप पुढे सरकणारे दगड जगप्रसिद्ध आहेत. हे दगड पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देतात. ही दरी समुद्रसपाटीपासून 282 फूट खोल आहे. इतकी खोल असूनही ही दरी पूर्णपणे कोरडी आहे. याठिकाणी एकेकाळी समुद्र असावा असा दावा भूगर्भशास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून खाली असून तिथे मीठही सापडले आहे. यामुळेच येथे एकेकाळी समुद्र असावा असे संशोधकांचे म्हणणे आहे.
दरीजवळील दगड सरकण्यामागे वेगवेगळे सिद्धांत
या दरीजवळील दगड सरकण्यामागे वेगवेगळे सिद्धांत सांगितले जातात. सन 1972 मध्ये संशोधकांची एक टीम याठिकाणी आली व त्यांनी सुमारे सात वर्षे या दगडांचा अभ्यास केला. त्या काळात त्यांनी विशेषतः 317 किलो वजनाच्या दगडाचे निरीक्षण केले. त्यांच्या संशोधनादरम्यान हा दगड अजिबात हलला नाही. मात्र, काही वर्षांनी तो दगड पुन्हा शोधण्यासाठी संशोधक तिथे गेल्यावर तो दगड एक किलोमीटर अंतरावर सापडला. हे पाहिल्यावर संशोधक चकीत झाले.
वाऱ्याबरोबर दगड पुढे ढकलले जात असल्याचा दावा
हे दगड जोरदार वार्यामुळे पुढे सरकत असल्याचा अनेक संशोधकांचे मत आहे. मात्र, याबाबत एकमत नाही. हे दगड तेथील मातीत असलेल्या सूक्ष्मजंतूंमुळे हलतात असे स्पेनच्या कॉम्प्युटेन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे. हे सूक्ष्म जीव मातीला स्निग्ध बनवतात. त्यामुळे दगड मातीवर फिरतात असा दावा त्यांनी केलाय. या ठिकाणी पाण्याचा काही अंश शिल्लक आहे. हे पाणी थंडीत गोठते आणि पृष्ठभागावरील दगडांना खाली घट्ट चिकटते. त्यानंतर ज्यावेळी हवामान उष्ण होते, तेव्हा दगडाला चिकटलेला बर्फ वितळतो व वाहत्या वाऱ्याबरोबर दगड पुढे ढकलले जातात. तेथील वाळूही दगडांना हलण्यास मदत करते असा दावा काही वर्षांपूर्वी संशोधकांच्या एका टीमने केला होता.