Viral Video : भर रात्री रस्त्यावर विचित्र आकृती, लोक म्हणतायत हा तर एलियन, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक विचित्र आकृती रस्त्यावरुन चालताना दिसतेय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा केला जातोय. (alien strange figure jharkhand hazaribagh)

Viral Video : भर रात्री रस्त्यावर विचित्र आकृती, लोक म्हणतायत हा तर एलियन, व्हिडीओ व्हायरल
hazaribagh viral video of alien
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 3:58 PM

झारखंड : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ शेअर केले जातात. यामधील काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यात पाडतात. सध्या असाच एक चक्रावून सोडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विचित्र आकृती रस्त्यावरुन चालताना दिसतेय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा केला जात असून तो झारखंड राज्यातील हजारीबागमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओतील आकृती ही भूत किंवा एलियन असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. (strange figure seen walking on Jharkhand Hazaribagh road people saying it is Alien)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ झारखंड राज्यातील हजारीबागमधील आहे. हजारीबागमधील कटकमसांडी-चतरा रोडवरच्या छड़वा डॅमजवळचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ रात्री शुट केला असून यामध्ये काही दुचाकीस्वार रस्त्याने जात असल्याचे दिसतेय. मात्र, पुलावरुन जात असताना या दुचाकीस्वारांसमोर अचानक एक विचित्र आकृती समोर आली आहे. किर्रर्र  अंधारात पांढऱ्या रंगाची ही आकृती रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. यावेळी मागे उभे असलेले चुकाकीस्वार पाहून ही आकृती मध्येच थांबल्याचेसुद्धा दिसत आहे. नंतर लगेच थोड्या वेळाने ही आकृती पुन्हा पुढे चालत आहे.

नेटकऱ्यांचा विविध प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून तो व्हायरल झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळापासून या व्हिडीओला शेअर केले जात आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओमधील आकृती एलियन की भूत ?

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेक लोक आपापला कयास लावत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असलेली आकृती ही एक भूत असल्याचे काही नेटकरी म्हणतायत. तर काही लोक व्हिडीओमध्ये दिसणारी आकृती ही परगृहावरील एलियन असल्याचा दावा करतायत. असे असले तरी ही आकृती नेमकी कशाची आहे ? व्हिडीओमध्ये दिसणारी ही आकृती म्हणजे नेमकं कोण आहे ? याचे अजून ठोस उत्तर अजूनतरी मिळालेले नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

पाहा व्हिडीओ :

(नेटकऱ्यांनी केलेल्या कोणत्याही दाव्याचे आम्ही समर्थन करत नाही)

 इतर बातम्या :

Video : लाडाच्या चिमणीचा रुबाबच न्यारा, स्केटिंगचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

झुम मिटींग सुरु असताना खासदाराने केली कॉफीच्या कपामध्ये लघवी, टीकेची झोड उठल्यानंतर माफी

Viral Video | छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, जिद्दीला सलाम ठोकत थेट आयएएस अधिकाऱ्याने मानलं गुरु

(strange figure seen walking on Jharkhand Hazaribagh road people saying it is Alien)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.