Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तंदूरी ऑम्लेटचा तडका, अंग अंग भडका..! दिल्लीच्या या काकांनी बनवलीय अजबच रेसिपी, Video Viral

तंदूरी ऑम्लेट (Tandoori Omelette) कधी खाल्लं आहे का? आजकाल दिल्ली(Delhi)तल्या विकासपुरी भागात एक काका असंच ऑम्लेट बनवून लोकांना सर्व्ह करत आहेत. पण सोशल मीडिया(Social Medai)वर समोर आलेली रेसिपी पाहिल्यानंतर यूझर्स चक्रावले आहेत. व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तंदूरी ऑम्लेटचा तडका, अंग अंग भडका..! दिल्लीच्या या काकांनी बनवलीय अजबच रेसिपी, Video Viral
तंदूरी ऑम्लेट बनवणारे काका
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 3:46 PM

Tandoori Omelette Video : खाद्यपदार्थांचे व्हिडिओ यूझर्सना आवडत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर शेअर होताच ते व्हायरल होतात. ऑम्लेट तुम्ही अनेक प्रकार खाल्ले असतील, पण तुम्ही तंदूरी ऑम्लेट (Tandoori Omelette) कधी खाल्लं आहे का? आजकाल दिल्ली(Delhi)तल्या विकासपुरी भागात एक काका असंच ऑम्लेट बनवून लोकांना सर्व्ह करत आहेत. पण सोशल मीडिया(Social Medai)वर समोर आलेली रेसिपी पाहिल्यानंतर यूझर्स चक्रावले आहेत. खरं तर, हे काका ऑम्लेटमध्ये इतकं लोणी आणि चीज टाकत आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की तुम्ही ऑम्लेट खाल्लं की लोणी आणि चीज. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्सचं म्हणणं आहे, की हे काका हार्ट अटॅक आणल्याशिवाय राहणार नाहीत. दिल्लीच्या विकासपुरी भागात काका ई-रिक्षातून अंडी विकतात.

ऑम्लेटची रेसिपी

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की अंड्यावाले काका चीज आणि बटरनं भरलेलं तंदूरी ऑम्लेट कसं बनवत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला, काका एका भांड्यात हिरव्या मिरच्या, कांदे आणि मसाले टाकून अंडी फोडतात. यानंतर पॅनवर संपूर्ण लोणी वितळवतात. नंतर अंड्याचं मिश्रण पॅनवर पसरवतात. त्यानंतर ते शिजवण्यास सुरुवात करतात. नंतर ब्रेड आणि चीजचे दोन तुकडे ठेवतात. यानंतर ते उलटं करतात आणि तंदुरी सॉस लावतात. यानंतर, ब्लो टॉर्चच्या मदतीनं, पुन्हा त्यावर भरपूर लोणी वितळववून ओततात.

फायर तंदूरी ब्रेड ऑम्लेट

तंदूरी ऑम्लेटचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर delhifoodnest नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘टिप-टिप बरसा अमूल बटर, अंकल जी ने आग लगाई.’ यासोबतच तुम्ही बटर आणि चीजनं भरलेलं फायर तंदूरी ब्रेड ऑम्लेट ट्राय कराल, असं लिहिलं आहे.

यूझर्सच्या मजेशीर कमेंट्स

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्स प्रतिक्रिया देत आहे. एक यूझर म्हणतो, की मी खात्रीनं सांगू शकतो, की हे ऑम्लेट खाल्ल्यानंतर तुम्हाला हृदयरोग तज्ज्ञाची गरज भासेल. त्याचवेळी आणखी एका यूझरनं मजेशीर टोनमध्ये कमेंट करताना लिहिलं आहे, की हे खाल्ल्यानंतर कुठेतरी आग लागेल, हे नक्की.’ त्यातही थोडंसं ऑम्लेट टाका.

Photo Viral : गाजराचा हलवा खाल्ला असेल, आता ‘हा’ भन्नाट हलवा खायला सज्ज व्हा!

Emotional Video Viral : छोट्या मुलीची मोठी गोष्ट! ‘या’ चिमुरडीचे बोबडे बोल डोळ्यांतून आणू शकतात पाणी.!!

आता शाकाहारी फिश फ्रायचा Video होतोय Viral; यूझर्स म्हणतायत, या किंमतीत दोन किलो मासे येतील!

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.