Video | रस्त्यावर विकतोय 24 कॅरेट सोन्याची कुल्फी, लोक म्हणाले, ‘हे कोण खातं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुल्पी विकत आहे. दुकानदार त्या कुल्फीत सोन्याची पन्नी मिसळतोय, त्याचबरोबर हे 24 कॅरेटचे शुद्ध सोने असल्याचा दावा कुल्फी विक्रेत्याने केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण हैराण झाले आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज व्हायरल व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. व्हायरल व्हिडीओ लोकांना आवडले की, ते इतरांना पाठवतात, त्याचबरोबर शेअर सुध्दा करतात. सध्या एक कुल्पी विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळेल की, एक कुल्पी विक्रेता (Street Vendor Sells Kulfi Wrapped In 24-Carat Gold) लोकांना 24 कॅरेटचे शुद्ध सोन्याची कुल्पी खायला देत आहे. विशेष म्हणजे या गोष्टी सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरु आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून विक्रेत्याचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी टीका देखील केली आहे.
त्या व्हिडीओमध्ये कुल्पी विक्रेता कशा पद्धतीने एका विक्रेत्याला कुल्पी विकत आहे. दुकानदार त्या कुल्फीत सोन्याची पन्नी मिसळतो. त्या दुकानदाराने 24 कॅरेटचे शुद्ध सोन्याची कुल्पी असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. लोकं म्हणतात की अशी कोणी कुल्पी खात का ?
View this post on Instagram
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती शेअर करण्यात आला आहे. mammi_ka_dhaba नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 43 हज़ारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला पाहून अनेकांनी कमेंट सुध्दा केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे, ही तर भारतातील सगळ्यात महान कुल्पी आहे. दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहीले आहे की, पाहून खूप चांगलं वाटलं, आता याची चव कशी असणार, सांगू शकत नाही.
सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लोकांना अशा पद्धतीचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडते. लोकं असे व्हिडीए इतरांना पाठवतात आणि स्वत: देखील सोशल मीडियावर शेअर करतात.