VIRAL NEWS : विद्यार्थ्याची चलाकी पाहून शिक्षिकेने दिले अधिक मार्क, पाहा विद्यार्थ्याने काय केले
एका मुलाची उत्तर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये मुलाने प्रश्नांची उत्तरं अशी दिली आहेत की, तुम्ही सुध्दा त्या मुलाचे फॅन झाल्याशिवाय राहणार नाही.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक उत्तर पत्रिका चांगलीचं व्हायरल झाली आहे. मुलं काही प्रश्नांची उत्तर अशी देतात की तुम्ही ते पाहतचं राहिलं पाहिजे. काहीवेळेला विद्यार्थी परीक्षेत (student exam) अशी उत्तर देतात की ते स्वत:कंट्रोल नाही करु शकत. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा अनेक प्रश्न पत्रिका पाहायला मिळाल्या आहेत. सध्या एका मुलाची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल (Viral tweet) झाली आहे. त्यामध्ये मुलाने असं उत्तर दिलं आहे की, त्या मुलांकजे किती टॅलेंट आहे हे तुम्ही पाहू शकता ?
खरंतर, एका मुलाने मिळालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे उत्तर तिथचं शोधून शिक्षिकेचं मन जिकलं आहे. मुलाचं टॅलेंट पाहून शिक्षिका अधिक खूश झाली आहे. शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यांला त्यामुळे अधिक मार्क दिले आहेत. त्या गोष्टीचं ट्विट सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झालं आहे. आतापर्यंत हे ट्वि्ट चार लाख लोकांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, मुलाकडे एक वेगळचं टॅलेंट आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे की त्याच्या त्याच्या वैचारीक बुद्धमत्तेला सलाम.
damn he’s good pic.twitter.com/xVD3gCzYeW
— internet hall of fame (@InternetH0F) March 19, 2023
हा सोशल मीडियावर @InternetH0F या नावाने शेअर करण्यात आला आहे. त्या ट्विटला एक कॅप्शन देण्यात आलं आहे, हे तर मोठी कमाल आहे. त्या उत्तरपत्रिकेवर इंग्रजी भाषेत एक प्रश्न लिहीला आहे. पाच असे शब्द लिहिले आहेत, ते तुम्ही म्हणू शकता. (Write Five words you can spell)? हा पाच मार्कांचा प्रश्न आहे. उत्तरासाठी पाच उत्तारे देण्यात आले आहेत. विद्यार्थ्याने चलाकी दाखवली आणि त्यातील एक एक शब्द व्यवस्थित लिहिले आहेत. जे प्रश्नात दिलेले आहेत. हे असे 1. Five, 2. Words, 3. You, 4. Can, 5. Spell शब्द आहेत. ज्यावेळी उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या हाती आली त्यावेळी ती अधिक खूष झाली. त्या विद्यार्थ्याला अधिक गुण दिले. इतकचं नाही तर त्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला अधिक चलाक असं म्हटलं आहे.