Viral: दे धपाक…तुंबळ हाणामारी…शाळेची पोरं भिडली, पण काका शिरले, आणि दोघांनाही सटकवलं!
लोणावळ्यात शाळेच्या पोरांमध्ये फिल्मीस्टाईल हाणामारीचा प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शाळेत कुणी भांडलं नाही असं होत नाही, भांडणं, रुजवे-फुगवे आणि मैत्री ही शाळेत होतच असते. पण शाळेतल्या पोरांची भांडणं थेट हाणामारीवर (Students Fight) आली की मग विषय थोडा गंभीर होतो. असाच एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोरांचे 2 गट एकमेकांवर तुटून पडलेले दिसत आहेत. हा सगळा प्रकार कुठला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ही घटना आहे लोणावळ्यातली. (Lonavala Student Fight)
लोणावळ्यात शाळेच्या पोरांमध्ये फिल्मीस्टाईल हाणामारीचा प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये पोरं की एकमेकांवर हात उचलताना दिसत आहे. लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे, मात्र, ही भांडण जेव्हा ऐन शिगेला होती, तेव्हा एक काका शिरले, आणि पोरांची भांडणं त्यांच्याच स्टाईलने सोडवली.
पाहा व्हिडीओ:<
Lonawala Students Fight | लोणावळ्यात विद्यार्थ्यांच्या फिल्मी स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ वायरल -tv9 #lonawala #students #fight #viralvideo pic.twitter.com/em9gxYc8tV
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 16, 2022
/h3> त्याचं झालं असं, की शाळेच्या परिसरात कुठल्यातरी छोट्या कारणावरुन 2 पोरांमध्ये जुंपली, आधी हे भांडण शब्दांने सुरु होतं.त्यानंतर त्यात शिव्यांची लाखोली वाहिली जाते, आणि मग हे दोघेही एकमेकांवर तुटून पडतात.
आता 2 आपल्या मित्राला कुणीतरी मारतंय, म्हटल्यावर पोरं मागे थोडीच राहणार, दोन्ही बाजूच्या मुलांचे गटही या भांडणात सामील होता. तेव्हा तिथं असलेले रहिवासी त्यांचा हा व्हिडीओ काढतात.
स्थानिकांनी या मुलांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे इतका रागात होते, की अजून त्यांना जोर चढत होता. पण तितक्यात एक काका भांडणात पडले, आणि दोन्हीकडच्या मुलांना आपल्या हाताचा प्रसाद दिला. या दोघांसाठीही या प्रसाद पुरेसा ठरला आणि ही मुलं वेगळी झाली.
या काकांच्या एन्ट्रींने सगळ्यांनाच गार केलं, आणि हे काका या व्हिडीओत भाव खावून गेले. लोणावळ्यातील VPS महाविद्यालयातील ही मुलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भांडणाची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.