Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Target Punishment : इतकी कडू शिक्षा! टार्गेट नाही करता आले पूर्ण, कंपनीने काढला कर्मचाऱ्यांवर असा राग

Target Punishment : या कंपनीने उत्तम कामगिरी न बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजब शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे या कर्मचाऱ्यांचे तोंड कडू पडले. या शिक्षेविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. पण कंपनीवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही.

Target Punishment : इतकी कडू शिक्षा! टार्गेट नाही करता आले पूर्ण, कंपनीने काढला कर्मचाऱ्यांवर असा राग
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 7:48 PM

नवी दिल्ली : जगात काय घडेल काहीच सांगता येत नाही. चीनमधील या कंपनीचं (Chinese Company) उदाहरण घ्या ना. टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून या कंपनीने कर्मचाऱ्यांना अशी शिक्षा दिली की त्यांचे तोंड कडू पडले. या गहजब शिक्षेने सर्व कर्मचाऱ्यांचे डोके चक्रावले. सकाळी कार्यालयात येताना आपल्या सोबत असे काही घडेल, याची कल्पनाच नव्हती. उद्दिष्ट पूर्ण केले नाही. अपेक्षित कामगिरी न बजावल्याने कंपनीने फैलावर तर घेतलेच पण एक लक्षात राहील अशी शिक्षा (Target Punishment) सुनावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शाळेची आठवण झाली. या कंपनीने उत्तम कामगिरी न बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजब शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे या कर्मचाऱ्यांचे तोंड कडू पडले. या शिक्षेविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. पण कंपनीवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही.

कॉर्पोरेटला लाजवले या कंपनीने कॉर्पोरेट कल्चरला लाजवेल अशी शिक्षा सुनावली. यासंबंधीचे व्हिडिओ आणि छायाचित्र चीनसहीत जगभरातील सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले. या धाकटशाहीविरोधात दस्तूरखुद्द चीनमध्येच आवाज उठविण्यात आला आहे. अशा शिक्षेमुळे चीनमधील लोकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

खाऊ घातले कारले साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या जियांगशू प्रांतात हा कारानामा समोर आला आहे. Suzhou Danao Fangchengshi Information Consulting असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी शैक्षिणक आणि प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. टार्गेट पूर्ण करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीने ही अजब शिक्षा दिली. त्यांना कार्यालयात येताच एका रांगेत उभे करुन कारले खाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. गरजवंताला अक्कल ठेऊन भागत नाही. कंपनीच्या आदेशाने कर्मचाऱ्यांनी कारले (Bitter Gourd) खाल्ले. कंपनीने वाद वाढल्यावर कर्मचाऱ्यांनी अनुमती दिल्यावरच ही शिक्षा अंमलात आणण्यात आल्याची सारवा सारव केली. याविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली.

हे सुद्धा वाचा

कंपनीला नाही पश्चाताप अवमान, अपमान करण्यासाठी ही शिक्षा देण्यात आली नाही. कौतूक आणि शिक्षा या नियमातंर्गत हा प्रकार करण्यात आला. कर्मचारी अशा शिक्षेपासून वाचण्यासाठी अधिक मेहनत करतील. त्यामुळेच हा घाट घालण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ही शिक्षा इजा पोहचवणारी नसल्याचे सांगत, कंपनीने या कृतीवर कसला ही पश्चाताप नसल्याचे म्हणणे मांडले. सोशल मीडियावर कंपनीवर चौफेर टीका करण्यात आली. कंपनीने कर्मचाऱ्यांना काढून टाकले असते तर चांगले झाले असते, अशी तिखट प्रतिक्रिया पण देण्यात आल्या.

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.