ऐन दिवाळीआधी गुजरातमधून डोकं चक्रावणारं प्रकरण समोर आलं आहे. इथं काही मुलं गटारीच्या झाकणावर म्हणजेच मॅनहोलवर फटाके फोडत होते. तेवढ्यात या गटारीलाच आग लागली. या आगीत काही मुलं भाजली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ( Surat: Gutter burns while firecrackers explode on manhole, children burst into flames)
ही सगळी घटना सूरत शहरातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथल्या तुलसी चरण सोसायटीबाहेर काही मुलं फटाके पेटवत होते. तितक्यात गटारीला आग लागली. क्षणार्धात त्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. त्यात पोरं भाजून निघाली. नशीबाने ही पोरं वेळीच बाजूला झाली, त्यामुळे कुणीही गंभीररित्या यात भाजलं नाही.
व्हिडीओ पाहा:
मोदींच्या गुजरातमध्ये ‘गटर गॅस’ असल्याचं सिद्ध झालं आहे, सूरतमध्ये फटाके फोडत असताना गटारच पेटलं, नशिबाने फटाके फोडणारी पोरं वाचली. #CRACKERS #Fireinguttur pic.twitter.com/liRTxCoML4
— Ashish A Suryawanshi (@AshishsSpeak) October 30, 2021
गटारीत सडणाऱ्या गोष्टींमधून मिथेन गॅस बाहेर पडत असतो. जो अतिज्वलनशील मानला जातो. अगदी हीच प्रक्रिया बायोगॅस प्लांटमध्येही होत असते. नशिबाने या गटारी जास्त प्रमाणात हा गॅस नव्हता, त्यामुळे काहीच वेळात ही आग विझली.
अजून एका मीडिया रिपोर्टनुसार, या सोसायटीच्या बाजूलाच एका गॅस पाईपलाईनचं का सुरु आहे. त्यामुळे त्यातून लिक होणारा गॅस गटारीत भरला गेल्याचाही अंदाज आहे. त्यामुळेच जेव्हा या मुलांनी गटारीच्या झाकणावर फटाके पेटवले, तेव्हा आगीचा भडका उडाला. सध्या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या चिमुरड्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हेही पाहा: