Video : तीन बिबट्यांनी घेरले, तरी एका लहान प्राण्याने दिली जोरदार टक्कर, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
जिद्द असेल तर मोठे संकटही छोटे होते, जंगलातील तीन बिबट्यांनी एका छोट्या प्राण्यासमोर शरणागती कशी पत्करली त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : ‘हिंमत ए मर्दा तो मदत ए खुदा’ अशी काहीशी उर्दू मध्ये म्हण आहे. जर माणसाकडे धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही संकट छू मंतर होऊन जाते. असाच एक चित्तथरारक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक आकाराने लहान प्राणी तीन-तीन बिबट्यांच्या गराड्यात अडकला आहे, परंतू धैर्याने त्यांचा सामना करीत आहे, पाहा या व्हिडीओला तुम्ही नक्कीच या छोट्या प्राण्याच्या धाडसाचे आणि हिंमतीचे कौतूक कराल…
सोशल मिडीयावर व्हायरल होणारे वाईल्ड लाईफचे व्हिडीओ नेहमीच मनोरंजक आणि थरकाप उडविणारे असतात. या व्हिडीयोमध्ये दिसणाऱ्या छोट्या जंगली प्राण्याला बॅजर ( Badger) म्हणतात. हिंदीत त्याला बिज्जू म्हणतात. हा प्राणी अमेरिकेत पहायला मिळतो. हा प्राणी त्याच्या पेक्षा आकारामान आणि ताकदीने मोठ्या असलेल्या तीन-तीन लेपर्ड म्हणजेच बिबट्यांशी नेटाने सामना करीत आहे. बिबट्यांनी त्याला अनेकदा चावे घेत दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. अन्य दोन बिबटे शेजारी त्याच्या तुटून पडत आहेत. परंतू तो ही आपल्या धारदार दातांनी बिबट्यांवर हल्ला करीत आहे. तेव्हा बॅजरने बिबट्याच्या जबड्यातून आपली सुटका करीत हल्ला करताना पाहून बिबटेही त्याला बिचकून आहेत. काही वेळाच्या तुंबळ लढाईनंतर आता तिन्ही बिबट्यांशी लढाई करुन हा शुर प्राणी विजेत्याच्या थाटात तेथून निघताना दिसत आहे. तर बिबटे देखील त्याचा नाद सोडून हार मानत तेथून निघून जाताना दिसत आहे.
हा पाहा व्हिडीओ
The badger is the most fearless animal on earth. pic.twitter.com/pXp2ngQpPD
— The Best (@Figensport) May 3, 2023
या व्हिडीओला ट्वीटरवर @Figensport नावाच्या खात्यावरून युजरने शेअर केला आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडीओला तीस लाखाहून अधिक युजरनी पाहीले आहे., तर पन्नास हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. या छोट्याशा प्राण्याची हिंमत पाहून नेटकरी त्याचे अन्य व्हिडीओ देखील शेअर करीत आहेत. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये हा प्राणी कोणाही घाबरत नसून एकट्याने मोठ्या जंगली प्राण्यांनी टक्कर देत असल्याचे म्हटले आहे.