Kili Paul : टांझानियाचा इन्स्टास्टार किली पॉलवर चाकूने हल्ला, हाताला गंभीर जखम…

किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल दोघे इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहेत. किलीच्या इन्स्टाग्रामवर साडे 36 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. भारतात ते लोकप्रिय आहेत.

Kili Paul : टांझानियाचा इन्स्टास्टार किली पॉलवर चाकूने हल्ला, हाताला गंभीर जखम...
टांझानियाचा इन्स्टास्टार किली पॉलवर चाकूने हल्ला
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 10:39 AM

मुंबई : टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलवर (Kili Paul) चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. सोबतच त्याला लाठ्या-काठ्यांनीही मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. अज्ञात लोकांनी त्याच्यावर हल्ला केलाय. पण यात तो थोडक्यात बचावला आहे. किलीने त्याच्या इन्स्टाग्रामवरून (Instagram) या बाबतची माहिती दिली.पण तो गंभीर जखमी झाला आहे. किली पॉलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, ‘माझ्यावर 5 अज्ञात लोकांनी हल्ला केला. माझ्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे. माझ्या हाताला 5 टाके पडलेत. याशिवाय मला लाठ्या-काठ्यांनीही मला मारहाण करण्यात आली. पण मी देवाचे आभार मानतो, हल्ला होऊनही मी थोडक्यात बचावलो आहे. माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.’ किलीने 29 एप्रिलला ही स्टोरी शेअर केली होती.

किलीवर हल्ला

टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. सोबतच त्याला लाठ्या-काठ्यांनीही मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. अज्ञात लोकांनी त्याच्यावर हल्ला केलाय. पण यात तो थोडक्यात बचावला आहे. किलीने त्याच्या इन्स्टाग्रामवरून या बाबतची माहिती दिली.

पंतप्रधानांकडून स्तुतीसुमनं

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात टांझानियाच्या या सोशल मीडिया स्टारचं कौतुक केलं होतं. किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल हे दोघे भारतीय गाण्यांवर रील्स बनवतात त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. त्यासाठी पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं.या दोघांनाही भारतीय संगीताची आवड, क्रेझ आहे आणि त्यांच्या व्हीडिओला चांगली लोकप्रियता मिळतेय, असं पंतप्रधान म्हणाले होते. पंतप्रधानांच्या स्तुतीनंतर या दोघांची लोकप्रियता झपाट्याने वाढली होती.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

किली पॉल कोण आहे?

किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल दोघे इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहेत. किलीच्या इन्स्टाग्रामवर साडे 36 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. भारतात ते लोकप्रिय आहेत. ते बॉलिवूडच्या गाण्यांवर रील्स बनवतात. त्याला चांगली प्रसिद्धी मिळते.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.