महाशिवरात्रीनिमित्त खमंग आणि खुसखुशीत अशा साबुदाण्याच्या ‘या’ पदार्थाचा Video झालाय Viral
Instant Sabudana Thalipeeth : नुकतीच महाशिवरात्र (Mahashivratri) झाली. यात साबुदाण्याची एक रेसिपी (Recipe) व्हायरल (Viral) झालीय. महाशिवरात्रीनिमित्त अपलोड केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
Instant Sabudana Thalipeeth : नुकतीच महाशिवरात्र (Mahashivratri) झाली. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात भगवान शंकराचं पूजन भाविकांनी केलं. यादिवशी उपवासही केला जातो. उपवास म्हटलं, की वरई/भगर, साबुदाणा आदींपासून बनवलेले पदार्थ त्याचबरोबर फलाहार सेवन केला जातो. फलाहार प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे साबुदाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. याच साबुदाण्याची एक रेसिपी (Recipe) व्हायरल (Viral) झालीय. महाशिवरात्रीनिमित्त अपलोड केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. साबुदाणा न भिजवता खुसखुशीत थालीपीठं कशी करायची, ते या व्हिडिओत सांगितलंय. अतिशय टेस्टी असा हा पदार्थ असून व्हिडिओही तसाच खुसखुशीत झालाय. उपवासाच्या दिवशी झटपट होणारा खमंग असा हा पदार्थ आहे.
रेसिपी कृती
व्हिडिओमध्ये साबुदाणा थालीपीठासाठी लागणारं साहित्य सुरुवातीला दाखवण्यात आलंय. साबुदाणा मिक्सरमधून काढून तो पंधरा मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा आहे. मग त्यात किसलेला बटाटा, जिरं, आलं. सैंधव मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, शेंगदाणा कूट असे हे पदार्थ एकजीव करून नंतर तव्यावर तूप टाकून मध्यम आचेवर भाजून घ्यावं. अशाप्रकारे हा अत्यंत खमंग, खुसखुशीत अशी ही थालीपीठं तयार…
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठी (MadhurasRecipe Marathi) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. महाशिवरात्रीनिमित्तच्या रेसिपीसाठी हा व्हिडिओ 28 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आला होता. याला 5 लाख 93 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात सातत्यानं वाढ होत आहे. ‘साबुदाणा न भिजवता बनवा कुरकुरीत साबुदाणा थालीपीठ | Instant Sabudana Thalipeeth |’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. (Video courtesy – MadhurasRecipe Marathi)