आनंद महिंद्रा म्हणतात, ‘हा कलाकार आहे तरी कोण?’ मला भेटायचंय, कंटेनरवर आख्खा लग्नाचा हॉल

उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मिडियावर सातत्याने वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करीत असतात. यावेळी अपलोड केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांना भुरळ पाडणार आणि तेवढेच वेगळेपण असणारा आहे...

आनंद महिंद्रा म्हणतात, 'हा कलाकार आहे तरी कोण?' मला भेटायचंय, कंटेनरवर आख्खा लग्नाचा हॉल
कंटेनर असा की त्यामध्ये चक्क लग्नाचा हॉलच
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 7:33 PM

मुंबई : समाजामध्ये वेगळेपणाची कदर ही केलीच जाते. माणसाच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाले की मग त्याचे सोने होते. समाजातील वेगळ्या अशा घटना टिपण्यामध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) हे कायम चर्चेत असतात. ते एक उद्योजक असले तरी सोशल मिडियावरही (Social Media) तेवढेच सक्रिय असतात. यातूनच ते वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करतात. आता त्यांनी असाच एक व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे, जो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. हा एका कंटनेरचा व्हिडिओ (Truck Video) असला तरी त्याचे खास वैशिष्ट आहे. हा कंटेनर साधासुधा नसून यामध्ये लग्नाचा हॉल आहे. ही तुम्हाला अतिशोक्ती वाटत असले तरी वास्तव आहे. ट्रकच्या पाठीमागच्या साईडला तब्बल 200 माणसांची व्यवस्था होईल असा तो हॉल आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंटेनरच्या मागच्या बाजूला लग्न समारंभात असतो तसा हॉल तर आहेच पण सर्व सोई-सुविधाही यामध्ये आहेत. यामध्ये पाहुण्यांसाठी एक खुर्ची-टेबलपासून ते एसी पर्यंतची सर्व सोय आहे. त्यामुळे या कंटेनरला चालतं-फिरतं लग्नघरही संबोधलं जातयं. या हॉलची जडणघडण केली असून अवघ्या काही वेळामध्ये त्याचे रुपांतर थेट हॉलमध्ये केले जात आहे.

लग्न समारंभाचा हॉल सोबत घेऊन मार्गस्थ होत असलेला कंटेनर आता चांगलाच चर्चेत आला आहे. लहान-मोठ्या कार्यक्रमासाठी याचा अगदी सहजरित्या उपयोग होऊ शकतो. मुलभूत सोई-सुविधांपासून सर्वकाही या कंटेनरमधील हॉलमध्ये आहेत.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे तो अधिक चर्चेत आला आहे. त्यामुळे आनंद महिंद्रा यांचे देखील कौतुक नेटकरी करीत आहेत. तुमच्या अशा व्हिडिओमुळे सर्वसामन्यांच्या कलेला वाव मिळत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

याबाबत व्यक्त होताना आनंद महिंद्रा म्हणाले आहेत की, ही कला ज्याने साकारली आहे त्याला मला भेटायचे आहे. यामुळे केवळ दुर्गम भागातील नागरिकांची सोयच होणार नाहीतर पर्यावरणासाठीही पोषक आहे. त्यांच्या या विचारसरणीला नागरिकांनी कमेंट करुन सलाम केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.