VIDEO | पोलिसाच्या अंगावर बसला पक्षी, त्यानंतर पुढं जे काही घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, केरळ पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ
Kerala Police | केरळ पोलिसांकडून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक पोलिस अंगावर बसलेल्या पक्षाला रस पाजत आहे. हा व्हिडीओ केरळ पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.
केरळ : सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. काहीवेळेला असे व्हिडीओ असतात की लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. परंतु आज तुमच्यासाठी आमच्याकडे आज एक चांगला व्हिडीओ (viral video) आहे. आजचा तुमचा दिवस एकदम चांगला जाण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा. पोलिस दिवसभर आरोपींशी लढत असते. काहीवेळेला त्यांना ब्रेक सु्द्धा देण्यात येतो. तुम्ही त्या व्हिडीओमध्ये एक पोलिस वर्दीमध्ये (maharashtra police) आहे. त्याच्या खिशाच्या बाजूला एक पक्षी (bird) बसला आहे. त्याचवेळी तो पोलिस त्या पक्षाला फुलांचा रस पाजत आहे अशी माहिती एका वेबसाईटनं दिली आहे.
केरळ पोलिसांनी एक व्हिडीओ ट्विटरवरती शेअर केला आहे. त्यामध्ये एक पोलिस लहान एका पक्ष्याला आपल्या हातांनी फुलांचा रस पाजत आहे. त्याचबरोबर तो पक्षी अजिबात घाबरत नाही, पोलिसाने जे काही काम केले आहे, त्यामुळे त्याचं सगळीकडे कौतुक सुरु आहे. पोलिस हसत-हसत त्या पक्षाला रस पाजत आहे.
ट्विटरवरती हा व्हिडीओ आतापर्यंत 18 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्यावर अधिक कमेंट येत आहेत. दोघांमधील प्रेम पाहून अनेकांनी पोलिसाचं कौतुक देखील केलं आहे. लोकांच्या समोर हा व्हिडीओ गेल्यानंतर त्यावर ते कमेंट देखील करीत आहेत. सगळ्यांना हा व्हिडीओ अधिक आवडला आहे.
” ഹൃദയത്തിൽ കൂട് കൂട്ടാം ” അപ്രതീക്ഷിതമായി യൂണിഫോമിലെ വിസ്സിൽ കോഡിലേക്ക് പറന്നെത്തിയ അതിഥി ❤️#keralapolice pic.twitter.com/jcVsqF78OF
— Kerala Police (@TheKeralaPolice) April 22, 2023
पक्षी आणि प्राण्यांचे आतापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये काहीवेळेला लोकांनी पक्षी आणि प्राण्यांना मदत केली आहे. तर काही व्हिडीओमध्ये प्राणी आणि माणसांमध्येअसलेलं प्रेम दिसून आलं आहे. प्राण्यांनी मनुष्यावरती हल्ले सु्द्धा अनेकदा केले आहेत. ते व्हिडीओ लोकांनी मिलियनमध्ये पाहिले आहेत.