VIDEO | मृत जोडीदाराला सोडत नव्हता पक्षी, एका व्यक्तीने दोघांनाही वेगळं करताच…
व्हिडीओमध्ये एका पक्षाचा मृत्यू झाला आहे. दुसरा पक्षी त्याला सोडत नाही. व्हिडीओ पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (viral video) झाला आहे. त्यामध्ये दोन पक्षांमध्ये किती प्रेम आहे, हे स्पष्ट दिसत आहे. प्राणी आणि माणूस यांच्यात प्रचंड प्रेम असतं. ते अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळतं. माणूस आणि प्राणी सुख दु:खात एकमेकांच्या कायम एकमेकांच्या संपर्कात असतात. प्रेम काय असतं ? हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा (shushant nanda) यांनी हा व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. एक पक्षी आपल्या मेलेल्या पक्षाची साथ अजिबात सोडतं नाही. हा व्हिडीओ तुम्हाला अधिक काय शिकवून जाईल.
व्हिडीओमध्ये एक पक्षी दुसऱ्या पक्षासाठी शोक करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी एक व्यक्ती मेलेल्या पक्षाला वेगळं करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी तो पक्षी त्या मेलेल्या पक्षाला सोडायला तयार नाही. दुसरीकडे त्या पक्षाला नेल्यानंतर तो सुध्दा दु:खी झाला आहे. जो पक्षी मेला आहे. त्या पक्षाला त्या व्यक्तीकडून पुरलं जातं आहे.
हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओ अधिक प्रतिक्रिया सुध्दा आल्या आहेत.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल झाला होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्राण्यांचे भांडण असलेले व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात. सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका पक्ष्याचा मृत्यू झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. या व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत