Video: पुंगीचा आवाज ऐकताच दुकानातून तरुण फणा काढून बाहेर आला, पाठलाग करु लागला, परंतु…
Video: पुंगीचा आवाज कानावर पडताचं मुलाने घेतला नागाचा अवतार, दुकानातून बाहेर येताचं फणा काढून पाठलाग, मग...
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाले आहेत. काही मजेशीर व्हिडीओ असतात किंवा काही गंभीर व्हिडीओ असतात. कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक भगवी कपडे घातलेली व्यक्ती दिसत आहे. ती व्यक्ती पुंगी (Pungi) वाचवायला सुरुवात करते. त्याचवेळेस एक तरुण तिथल्या दुकानातून फणा काढून बाहेर येतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
मुळात हा व्हिडीओ कोणत्या भागातला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु तो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्यामुळे त्याची अधिक चर्चा आहे. ज्यावेळी पुंगी वाजवण्यात एक व्यक्ती रस्त्यात गुंग आहे. त्यावेळी समोर असलेल्या दुकानातून एक तरुण बाहेर येतो. तो नागीन असल्याचा अवतार घेऊन बाहेर येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर जी व्यक्ती पुंगी वाजवण्यात गुंग आहे. तिचा पाठलाग करु लागतो. काही अंतरावर गेल्यानंतर ती व्यक्ती जाग्यावर थांबते.
हा मजेशीवर व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्या मुलाने सुपर अॅक्टिंग केली आहे. त्यामुळे अनेकांना एकद्या चित्रपटात पाहिलेला क्षण आठवेल एवढं मात्र नक्की.
View this post on Instagram
बटरफ्लाय नावाच्या व्यक्तीने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी व्हिडीओ आवडल्याचं लिहिलं आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.