मुंबई : सोशल मीडियावर (Tranding video) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ अधिक गमतीशीर असतात असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर मजेशीर व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला सुध्दा पडत आहेत. लोकं असे व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Social media Viral video) झाला आहे, त्यामध्ये वॉशरूममध्ये लावलेल्या हँड ड्रायरने (hand dryer machine) मुलगा केसं सुकवताना दिसतोय. तो व्हिडीओ केवळ सहा सेंकदाचा आहे. परंतु अनेक लोकांनी त्या व्हिडीओला चांगल्या कमेंट केल्या आहेत.
तरुण वॉशरूममध्ये लावलेल्या हँड ड्रायरच्या खाली आपली केसं सेट करीत आहे. त्यानं काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. त्याचबरोबर नवा देशी जुगाड लोकांना दाखवत आपली केसं सुकवत असल्यामुळे त्याचा व्हिडीओ अधिक लोकांना आवडला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर IPS अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या ट्विटरच्या अकाऊंटवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर कॅप्शन सुद्धा मजेशीर लिहिलं आहे.
Necessity is mother of invention… pic.twitter.com/iJ8J5MxG9x
— Arif Shaikh IPS (@arifhs1) February 2, 2023
त्या व्हिडीओला आतापर्यंत 37 हजार लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर आठशेच्यावरती लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचबरोबर व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लोकं मजेशीर कमेंट करीत आहेत. त्या एका व्यक्तीने कमेंटमध्ये हँड ड्रायर सुध्दा विचारात पडला असेल अशी कमेंट केली आहे.
विशेष म्हणजे एकाने कमेंटमध्ये भारतात काहीही होऊ शकतं असं लिहिलं आहे. त्यानंतर एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, याला म्हणतात आपली गरज पुर्ण करणे. त्यानंतर एकाने पहिल्यांदा हँड ड्रायरचा दोन्ही गोष्टीसाठी उपयोग झाल्याचं म्हटलं आहे.