Video : मुलाने अचानक कपडे काढले आणि मेट्रोमध्ये आंघोळ करण्यास सुरुवात केली, हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये अंघोळ करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक गोष्टी व्हायरल होतात. चांगले किंवा वाईट असे दोन पद्धतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) बिकनीतील एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत. काही लोकं मेट्रोमध्ये डान्स (Dance Video Viral) करीत असल्याचे दिसत आहेत. त्यामधील प्रत्येकाला व्हिडीओ द्यायचे आहेत.
आपल्या देशातील अनेकांना व्हायरल व्हायचं आहे, म्हणून ते व्हिडीओ करीत असताना वेगवेगळ्या गोष्टी करीत आहेत. परदेशात सुध्दा काही लोकं मेट्रो आणि ट्रेनच्या आतमध्ये काही करामती करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या गोष्टीची आपण कल्पना सुध्दा करु शकत नाही,अशी एक गोष्ट एका तरुणाने केली आहे. सध्या अमेरिकेतील न्यूयार्कमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या तरुणाने चक्क मेट्रोमध्ये अंघोळ केली आहे. ज्यावेळी तो तरुण हे सगळं कृत्य करीत होता. त्यावेळी सहप्रवासी हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पांढऱ्या रंगाचा शर्ट, आणि काळी रंगांची पँट प्रवास करीत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मुलगा प्रवास करीत असताना अचानक अंगातील कपडे काढतो. त्यावेळी बाजूला बसलेली लोकं नाकं मुरडत आहेत. त्याचवेळी त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये तो पाणी टाकतो. तसेच साबणाने अंधोळ करु लागतो. अंघोळ केल्यानंतर तो टॉवेलने अंग पुसतो.
कपडे घातल्यानंतर पुढच्या स्टेशनला उतरतो. हे सगळं पाहिल्यानंतर सहप्रवाश्यांना हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत .हा व्हिडीओ फेसबुकवरती princezee नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1.5 करोड लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओला अधिक मजेशीर कमेंट आल्या आहेत.