कॅमेरा सुरूच होता, अन् वृत्त निवेदिकेने केले असे काही की सर्वांच्या भुवया उंचावल्या
लाईव्ह प्रसारणादरम्यान अनेकदा बड्या बड्या वृत्त निवेदिकांकडून होत असतात. या वर्षी उत्तर भारत तसेच शेजारील पाकिस्तानातील न्यूज चॅनलकडून अशा गफलती होत असतात. असाच प्रकार एका जागतिक ख्यातीच्या चॅनलच्या वृत्त निवेदिकेकडून घडला आहे.
नवी दिल्ली : टीव्ही चॅनलच्या लाईव्ह प्रसारणामध्ये काही वेळा असे प्रसंग अनवधानाने घडतात की त्याची चर्चा अनेक दिवस सुरू राहते. ब्रेकींग स्टोरी ब्रेकींग करण्याच्या नादा बरेचदा वृत्त निवेदकांकडून काही गफलती होतात. त्यामुळे अनेकदा न्यूज अॅंकर सावधानतेने आपले काम करीत असतात. तरीही मानवी स्वभावानूसार काही चूका होतच असतात. अशीच एक चूक लाईव्ह प्रसारण सुरू असताना एका वृत्त निवेदिकेकडून झाली आणि तिच्या या प्रकाराची सोशल मिडीयावर नेट युजरकडून फिरकी घेतली जात आहे.
जगप्रसिध्द बीबीसी चॅनलच्या एका वृत्त निवेदिकेकडून अॅंकरींग करीत असताना एक गंमतीदार प्रकार घडला आहे. वृत्त निवेदिका लुकवेसा बुराक एक लंच टाईम सेगमेंट होस्ट करीत असताना हा प्रकार घडला आहे. न्यूज रिडींग केल्यानंतर बुराक हीने कॅमेरा बंद होण्याच्या कॅमेरामनच्या इशाऱ्याची वाट पाहिली नाही. आणि नको ते करून बसली. जेव्हा टीव्हीवर मोंटाज आणि म्युझिक सुरू झाले तेव्हा तिने कॅमेरा बंद समजून आळस झटकण्यासाठी आपल्या दोन्ही बाह्या वर केल्या रिलॅक्स झाली. नेमका हा प्रकार ऑनएअर लाईव्ह गेला. जेव्हा तिला कळले की आपण लाईव्ह आहोत तेव्हा तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन पाहण्यासारख्या झाल्या. ती खूपच वरमली आणि तिची नजर खाली गेली.
न्यूज अॅंकरचा हा व्हिडीओ आता Brexit Shambles नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ ऑनलाईन शेअर झाल्यानंतर या व्हिडीओला 9 लाख युजरनी पाहीला आहे. सोशल मीडिया यूजर या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करीत आहेत. काही लोकांनी न्यूज अॅंकरचे समर्थन देखील करीत आहेत. ही काही फार मोठी चूक नाही अशा चुका मानवी स्वभावानूसार होऊ शकतात.
हा पाहा व्हिडीओ…
So this just happened on BBC News ? pic.twitter.com/T8ca7VY4Co
— Brexitshambles (@brexit_sham) May 4, 2023
लाईव्ह प्रसारणादरम्यान अनेकदा बड्या बड्या वृत्त निवेदिकांकडून होत असतात. या वर्षी उत्तर भारत तसेच शेजारील पाकिस्तानातील न्यूज चॅनलकडून अशा गफलती होत असतात. पाकिस्तानातील पेशावरच्या पश्तो भाषेतील लोकल टीव्ही चॅनलच्या स्टुडीओत तर भूकंपाचे झटके सुरू असताना इतर कर्मचारी आजूबाजूला पळताना दिसत असताना Mahshriq TV न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक बातमी देण्याचे कर्तव्य पार पाडताना दिसला होता. त्या वृत्त निवदेकांकडून काही वेळा जशा चुका होतात. तशा अशा प्रकारच्या धैर्याच्या घटना घडत असतात. कधी स्वत:च्या सहकाऱ्याची वाईट बातमी द्यावी लागत तर कधी काही हास्यास्पद चुकाही घडत असतात. शेवटी तिही माणसेच असतात. त्यामुळे त्यांच्याकडून चुका घडत असतात.