VIDEO | रमजानची नमाज सुरु असताना इमामवर मांजरीने अचानक उडी मारली, मग पुढे काय झालं पाहा व्हिडीओत
आतापर्यंत हा व्हिडीओ पाच लोकांनी पाहिला आहे, ट्विटर यूजर्सने त्या व्हिडीओवरती प्रेम व्यक्त केलंय, आणि कमेंट सुध्दा केली आहे.
मुंबई : खूप कमी अशी लोकं असतात, त्यांना प्राण्यांवरती प्रेम करायला अजिबात आवडत नाही. अधिकतर लोकांचं कुत्र्यावर (DOG) अधिक प्रेम असतं. त्याचबरोबर मांजरावरती (CAT) सुध्दा अधिक प्रेम असतं. त्यामुळे त्यांना घरात एखाद्या माणसासारखं जपलं जातं. आम्ही तुम्हाला एक हृदयस्पर्शी व्हिडिओ दाखवत आहोत, जो पाहून तुम्हाला हसू येईल. नमाज सुरु असताना एक व्यक्तीच्या अंगावर मांजर उडी घेते, त्यानंतर काय होतं ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. विशेष म्हणजे हा व्हिडीओ (VIDEO VIRAL) तिथं असलेल्या एका व्यक्तीने शूट केला आहे. त्यावर आतापर्यंत अनेकांनी कमेंट आल्या आहेत.
हा व्हिडीओ अलातीकी नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरती शेअर केला आहे. 28 सेकंदाच्या त्या व्हिडीओमध्ये एक इमाम रमजानच्या नमाजचं वाचनं करीत आहे. त्याचवेळी एक मांजर त्यांच्या अंगावर उडी घेते. पण इमाम अजिबात विचलित न झाल्याचं पाहायला मिळत नाही. विशेष म्हणजे नमाज वाचन सुरु असताना मांजर त्यांना प्रेमाने कुरवाळत आहे. त्यानंतर मांजर काहीवेळाने आपल्या जागेवर जात आहे.
Cat jumps on Imam during qiyam (taraweeh) prayers and he behaves exactly like any imam Insha’Allah would.#Ramadan pic.twitter.com/QHGXSgiZgK
— Alateeqi العتيقي (@BinImad) April 4, 2023
आतापर्यंत हा व्हिडीओ पाच लाख लोकांनी पाहिला आहे, ट्विटर यूजर्सने त्या व्हिडीओवरती प्रेम व्यक्त केलंय आणि कमेंट सुध्दा केली आहे. “ओएमजी एकाच वेळी खूप मजेदार आणि गोंडस.” दुसर्या यूजरने कमेंट केली की, “व्हिडिओने हृदयाला स्पर्श केला. हा व्हिडीओ अधिक व्हायरल होत असून त्यावर मजेशीर कमेंट सुध्दा येत आहे.