Video: नातवाच्या गाडीवर बसलेली आजी बिनधास्त, लोकांना टेन्शन, पाहा व्हिडीओ
नातू आजीला घेऊन बाईकवरुन सुसाट, लोकांनी घातली तोंडात बोट, म्हणाले यमराज...
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज नवे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. त्यामध्ये काही मजेशीर गोष्टी असतात किंवा काही गंभीर गोष्टी असतात. कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यापासून लोकांनी अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. कारण तो व्हिडीओ लहान मुलगा मोटारसायकल (Bike) स्पीडने चालवताना आहे. विशेष म्हणजे मुलगा मोटारसायकलवरती स्टंट करीत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
नेमकं व्हिडीओत काय आहे
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आजी नातवाच्या गाडीवर बिनधास्त बसली आहे. आजीला अजिबात टेन्शन नाही. परंतु नातवाचं गाडी चालवणं पाहून बाजूने जाणाऱ्या लोकांना अधिक टेन्शन आलं आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या लोकांनी नातवाला कमी स्पीडमध्ये गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे.
यूँहीं नहीं जाती सड़क हादसों में मासूम जान,#परवरिश में बड़ी गलतियां, “बड़ों” ने की हैं,
सड़क सुरक्षा में लापरवाही, आदतन सिखाई, जहाँ रोकना-टोकना था, वहीं ढिलाई की है. pic.twitter.com/s7kYyeohL5
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 26, 2022
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यावर अनेक लोकं कमेंट करत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. रस्ते अपघातात निष्पाप जीव जात नाहीत. मुलांच्या संगोपनात आई-वडीलांनी मोठ्या चुका केल्या आहेत. रस्त्याच्या सुरक्षेकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
या व्हिडिओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? कृपया कमेंट करून सांगा