Namib Desert: 5 कोटी 50 लाख वर्षे जुने वाळवंट! दिवसा 45 डिग्री तापमान तर रात्री हाडं गोठवणारी थंडी; इथं फक्त एलियनच…

हे वाळवंटाचा भूप्रदेश जिथे संपतो तिथूनच अथांग असा महासागर सुरू होतो. हे वाळवंट 5 कोटी 50 लाख वर्षे जुनं असल्याचा दावा केला जात आहे. येथे दिवसा 45 डिग्री तापमान तर रात्री हाडं गोठवणारी थंडी असते. यामुळेच इथं राहण जवळपास अशक्यच असं म्हणावं लागले. येथे एलियन्सचा वावर असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे. 

Namib Desert: 5 कोटी 50 लाख वर्षे जुने वाळवंट! दिवसा 45 डिग्री तापमान तर रात्री हाडं गोठवणारी थंडी; इथं फक्त एलियनच...
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 8:08 PM

लंडन : या जगातील अनेक ठिकाण नैसर्गिक चमत्काराचा आविष्कार पाहायला मिळत. या ठिकाणांचे वैशिष्ट्य पाहून शास्त्रज्ञही चकित झाले आहेत. असंच एक ठिकाण आफ्रिकेत आहे. आफ्रिकेत एक अनोख वाळवंट आहे. याला नामिबिया वाळवंट असं म्हणतात(coastal desert of Namibia). हे वाळवंटाचा भूप्रदेश जिथे संपतो तिथूनच अथांग असा महासागर सुरू होतो. हे वाळवंट 5 कोटी 50 लाख वर्षे जुनं असल्याचा दावा केला जात आहे. येथे दिवसा 45 डिग्री तापमान तर रात्री हाडं गोठवणारी थंडी असते. यामुळेच इथं राहण जवळपास अशक्यच असं म्हणावं लागले. येथे एलियन्सचा वावर असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे.

समुद्रच स्वतःच वाळवंटाच्या भेटीला येतो

आफ्रिकेतील नामिबिया वाळवंट निसर्गाचा अद्भूत अविष्कारच म्हणावं लागेल. जणूकाही समुद्रच स्वतःच वाळवंटाच्या भेटीला येत असल्याचा अद्भूत नजारा येथे पहायला मिळतो. नैऋत्य आफ्रिकेच्या अटलांटिक तटाला लागून असलेल्या या कोरड्या, वालुकामय प्रदेशाला ‘नामीब वाळवंट’ असे म्हटले जाते.

‘नामीब’ म्हणजे ‘जिथे काहीही नाही’

‘नामीब’ म्हणजे ‘जिथे काहीही नाही’असा याचा अर्थ होतो. हे वाळवंट तब्बल 5 कोटी 50 लाख वर्षे जुने असल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्या तुलनेत जगातील सर्वांत मोठे वाळवंट ‘सहारा’ वयाने लहान आहे. सहारा वाळवंट हे केवळ 20 ते 70 लाख वर्षे जुने आहे. दक्षिण अंगोलापासून 2 हजार किलोमीटर दूर दक्षिण आफ्रिकेपर्यंत हे नामीब वाळवंट पसरलेले आहे.

हे वाळवंट म्हणजे आश्चर्यकारक घटनांचे भांडार

नामीब वाळवंटाचा हा परिसर म्हणजे आश्चर्यकारक घटनांचे भांडारच आहे. हे प्रदेश मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागासारखा दिसतो. हा प्रदेश तीन देशांमधील 81 हजार चौरस किलोमीटर भागात पसरलेला आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दिवसा 45 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. तर, रात्रीच्या वेळेस हाड गोठवणारी अशी थंडी असते. त्यामुळे हा भाग मनुष्याने राहण्यास खडतर असाच आहे. तरही दरवर्षी लाखो पर्यटक या वाळवंटाला भेट देतात.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.