VIDEO | पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात हरीण पडलं, त्याला बाहेर काढण्यासाठी हत्तीनं केली मदत, व्हिडिओ पाहून तुम्हाला सुध्दा हसू येईल
TRENDING NEWS : गाळात रुतलेल्या हरणाला हत्तीने कशा पद्धतीने बाहेर काढलं हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सु्द्धा हसू येईल. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे रोज असंख्य व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. त्यामध्ये अधिकतर जंगलात प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्राण्यांनी एकमेकांना कशा पद्धतीने मदत केली, तेही व्हिडीओ पाहायला मिळतात. काहीवेळा प्राणी (Animal video) असे काही कारनामे करीत असतात की, ते लोकांना पाहायला अधिक आवडतात. त्या गोष्टीची आम्ही कल्पना सुध्दा करु शकत नाही. प्राणी सुध्दा आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक हत्ती हरणाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करीत आहे.
हत्तीचं झुंड त्या हरणाला पाहत आहे
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाण्यात एक हरीण रुतलं आहे. त्या हरणाला त्यातून बाहेर येता येत नाहीये. त्यावेळी तिथं असलेलं हत्तीचं झुंड त्या हरणाला पाहत आहे. हरीण तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हरण तिथून बाहेर निघत नाही. हरणाच्या मागे असलेला हत्ती चिखलात लाथ मारतो. हत्तीने लाथ मारल्यामुळे तो हरीण अलगद बाहेर पडतं.
If they can be compassionate, Why can’t we☺️ pic.twitter.com/okj8h9wxaB
— Susanta Nanda (@susantananda3) June 22, 2023
१३ सेंकदाचा व्हिडीओ आहे
हा व्हिडीओ आईएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटरच्या खात्यावरुन शेअर केला आहे. त्यांनी त्या व्हिडीओ कॅप्शन सुध्दा दिलं आहे. समजा ते दयाळू आहेत, तर आपण का दयाळू होऊ शकत नाही. तो १३ सेंकदाचा व्हिडीओ आहे. आतापर्यंत तो व्हिडीओ 32 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका युझरने लिहीलं आहे की, सर, खरं सांगितलं आहे. दुसरा नेटकरी म्हणतो, लोकांनी त्या प्राण्यांकडून काहीतरी शिकायला हवं. या व्हिडीओच्या बाबत तुमचं मतं काय आहे आम्हाला नक्की कळवा.