VIDEO : चपळाईने सिंहीणीला चकमा देऊन हरण पळाले, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा…
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हरणाच्या पाठी लागलेल्या सिंहीणीला हरणाने कशा पदध्दतीने चकवा दिलाय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
मुंबई : सिंहाला जंगलाचा (Lion Viral Video) राजा म्हटलं जातं, जंगलातील दुसरा कोणताही प्राणी सिंहाशी (Lion) भांडण करण्याचा विचार सुध्दा करीत नाही. विशेष म्हणजे लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडतात. काही लोकं प्राण्यांचे व्हिडीओ पाहून अधिक खूश होतात. जंगलात सिंह आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करून शिकार करतो. काहीवेळेला सिंहाला सुध्दा चपळ प्राण्यापुढे हार मानावी लागते. सध्या एक व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर अधिक व्हायरल (Animal Viral Video) झाला आहे. त्यामध्ये एक हरिण चपळता दाखवून सिंहाच्या तावडीतून आपली सुटका करीत आहे.
सिंहीणीने हरणावरती झडप घातली
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका हरणाची शिकार सिंहीण करीत आहे. सिंहीणीने सुरवातीला हरणाच्या अंगावरती झडप घातली. परंतु वेगात असलेल्या हरणाने चलाखपणा दाखवत सिंहीणीला अंगावरुन झटकले. त्यानंतर पुन्हा सिंहीणीने हरणावरती झडप घातली, त्यावेळी सुध्दा वेगात असलेल्या हरणाने सिंहणीला खाली पाडले. हरण सुध्दा हार मानायला तयार नसल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे इतक्या भयानक हल्ल्यातून हरण सुखरूप बचावले आहे.हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
शेवटी हरीण जिंकलं
व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती आईपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वाघीण हरणाची शिकार करीत असल्याचं दिसतं आहे. ज्यावेळी हरणाच्या पाठीवर सिंहीण हल्ला करते, त्यावेळी हरण चपळाईने निसटते. त्याचबरोबर आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. शेवटी हरिणं तिथं झालेल्या संघर्षात जिंकलं आहे. तिथून हरीण आपला जीव वाचवून निघून गेली आहे.
Simply #Amazing
Survival ??@ParveenKaswan @susantananda3 @SudhaRamenIFS @World_Wildlife @WWF pic.twitter.com/LXJtVTv0oT
— Rupin Sharma IPS (@rupin1992) May 18, 2023
लोकांना व्हिडीओ आवडला
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेचत आहे. त्यामध्ये सिंहीणीला शिकार करताना यश आलेलं नाही. हा व्हिडीओ ३ हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंट करीत असताना लिहीलं आहे की, तुला कोणीही मारू शकत नाही.