Loyal Dog: वफादार कुत्ता! कुत्र्याने वाचवली मालकीनीची इज्जत; नराधम करणार होता बलात्कार
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ही धक्कादायक घटना घडलेय. एका महिलेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला आपल्या कुत्र्यासोबत फिरायला गेली असताना तिच्यासह ही घटना घडली. आरोपीने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यासोबत असलेल्या तिच्या पाळीव कुत्र्यामुळे महिलेवर होणारी अती प्रसंगाची घटना टळलेय. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे हल्लेखोराचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
न्यूयॉर्क : कुत्र्याला(dog) आपण इमानदार(Loyal) प्राणी असे समजतो. कुत्र्याची इमानदारी दर्शवणाऱ्या अनेक घटना देखील नेहमी घडतच असतात अशीच एक घटना न्यूयॉर्कमध्ये घडली आहे. एका कुत्र्याने आपल्या मालकीणीची इज्जत वाचवली आहे. एक नराधम या महिलेवर बलात्कार(rape) करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिच्या कुत्र्याने जोर जोरात भुंकत आरोपीला पळवून लावले आहे. कुत्र्याच्या या कामगिरीमुळे या महिलेसोबत घडणारी अत्यंत वाईट घटना टळली आहे. अत्यंत कठिण प्रसंगातून महिलेला वाचवणाऱ्या तिच्या या कुत्र्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ही धक्कादायक घटना घडलेय. एका महिलेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला आपल्या कुत्र्यासोबत फिरायला गेली असताना तिच्यासह ही घटना घडली. आरोपीने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यासोबत असलेल्या तिच्या पाळीव कुत्र्यामुळे महिलेवर होणारी अती प्रसंगाची घटना टळलेय. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे हल्लेखोराचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
कुत्र्याच्या दक्षतेमुळे 30 वर्षीय महिलेसोबत अति प्रसंगाची घटना टळली
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ही महिला ब्रुकलिन फुटपाथवर तिच्या लहान कुत्र्याला घेवून वॉक करत होती. यावेळी एका आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी तक्रारदार महिलेला खेचून तिला फुटपाथवर पार्क केलेल्या कारच्या मागे नेऊन तिच्यावर अती प्रसंग करत असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगीतले. आरोपीने महिलेचा गळा दाबून तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला.
कुत्रा जोर जोरात भुंकू लागला
आरोपी महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. महिला मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती. मालकिनीला अडचणीत पाहून तिचा कुत्रा जोर जोरात भुंकू लागला. कुत्र्याचे भुंकने पाहून आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे ही महिला नराधमाच्या तावडीतून वाचली असून तिच्यावरील अती प्रसंग टळला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.