Watch : वाहतूककोंडी, सिग्नल आणि ड्रायव्हरने असं केलं काम, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणावरून व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडीओ बंगळुरुच्या ट्राफिकमधला व्हायरल झाला आहे.
मुंबई : देशात वाहतूककोंडीची समस्या वर्षानुवर्षे तशीच आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी फुटली खरी, पण काही ठिकाणांची समस्या अजूनही कायम आहे. शहरांमध्ये तर वाहतुककोडींची समस्या जैसे थेच आहे. त्यापैकी एक गजबजलेलं शहर म्हणजे बंगळुरु. हे शहर आयटी हब म्हणून ओळखलं जातं. पण इथे वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे. दररोज हजारो प्रवासी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळतात. रोजच सोशल मीडियावर याबाबत काही ना काही व्हायरल किंवा पोस्ट होताना दिसतं. इतकी वाईट स्थिती बंगळुरुमध्ये आहे. त्यामुळे रोजचा प्रवास करणाऱ्या चालकांना आता त्याची सवय झाली आहे. असाच काहीसा सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूककोंडी लवकर फुटणार नाही याचा अंदाज ड्रायव्हरला असल्याने त्याने आपलं काम झटपट आटपून घेतलं.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर साई चंद बय्यावरपु याने शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये एक ड्रायव्हर आपलं दुपारचं संपूर्ण जेवण ट्राफिकमध्येच आटोपताना दिसत आहे. इतकंच काय तर तो आपलं जेवण करत असताना गाडी एक इंचही पुढे सरकली नाही हे विशेष..हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “बंगळुरुमधील पीक ट्राफिक मुव्हमेंट” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.
View this post on Instagram
आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तसेच या व्हिडीओखाली ट्राफिकबाबत चर्चाही रंगली आहे. इतकंच काय तर लोकं सरकारचे बाभाडे काढताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओखाली दिल्या आहेत.
एका युजर्सने लिहिलं आहे की, “खूपच दु:खद आहे. चालकाला नीट बसून जेवणही करता येत नाही. इतकी वाईट वाहतूककोंडी आहे.” दुसऱ्या युजर्सने मिश्किलपणे लिहिलं आहे की, “ड्रायव्हरने आपलं दुपारचं जेवण पटापट आटोपलं.” तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “मीही ऑफिसला जाताना ब्रेकफास्ट असाच आटोपतो.”
गेल्या महिन्यात ट्राफिकमधला असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा एक महिला ट्राफिकमध्ये लॅपटॉपवर काम करताना दिसली होती. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.