Jugaad Video | रिक्षाला लावले वॅग्नॉर गाडीचे पार्ट, चालकाचा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
Viral video | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्यक्तीने आपल्या रिक्षाला वॅग्नॉर कशी तयार केली आहे. हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल,
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय पाहायला मिळेल हे कोणीचं सांगू शकत नाही. रोज नवे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. लोकांना आवडलेले व्हिडीओ (Viral video) शक्यतो मिलियनमध्ये पाहिले जातात असं आतापर्यंत पाहण्यात आलं आहे. काही लोकांनी घरातील सामान वापरुन हेलीकॉप्टर तयार केलं आहे. काही लोकांनी घरगुती सामान वापरुन इलेक्ट्रीक स्कुटर तयार केली आहे. जुगाड (Jugaad Video) केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका रिक्षा चालकाने आपली रिक्षाला जुगाड करुन वॅग्नॉर कार (Wagon R Car) तयार केली आहे. ज्यावेळी ही रिक्षा रस्त्यावर चालताना दिसते. त्यावेळी लोकं रिक्षाकडं पाहत बसतात.
रिक्षाची वॅग्नॉर गाडी तयार करताना जुन्या गाडीचे पार्ट वापरण्यात आले आहेत. रिक्षाच्या मागच्या बाजूला वॅग्नॉरची मागची बाजू लावली आहे. तुम्ही मागून त्या रिक्षाला पाहिल्यानंतर तुम्ही देखील कन्फ्यूज होणार एवढं मात्र निश्चित. इतका मोठा जुगाड करण्यासाठी चालकाकडे एवढं मोठं डोकं आलं कुठून हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. ही रिक्षा पाहिल्यानंतर अनेकजण फोटो काढत आहेत. त्याचबरोबर केलेला जुगाड पाहत आहेत.
रिक्षा चालकाने जुन्या वॅग्नॉर आर व्हीएक्सआय मॉडेलचा एक भाग हरियाणा नंबर प्लेटसह चेरी कलरमध्ये वापरला आहे. रस्त्यावर धावणारी ही अनोखी वॅग्नॉर आर कार पाहून लोक अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी या रिक्षाच्या बाजूने जो कोणी जात असेल, त्याने त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ड्रायव्हरने लोकांना रिक्षात वॅग्नॉर कार सांगून बसवतो. इतर लोकांनाही मोठ्या उत्साहाने गाडीत बसणे आवडते असंही चालकाने सांगितले आहे.
#DesiJugaad. We have brains which will fail a qualified automobile engineer. Necessity is the mother of invention.#atmanirbharbharat pic.twitter.com/HJt2RhO8PE
— दीपक प्रभु/DeepakPrabhu (@ragiing_bull) August 25, 2022
रिक्षावाला म्हणतो की, आम्ही कार खरेदी करु शकलो नाही, परंतु तरी सुद्धा त्याची मजा घेत आहोत.त्यामुळे रिक्षा चालकाने जुगाड करुन रिक्षाला वॅग्नॉर बनवण्याचा निर्णय घेतला. हा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोकं त्या चालकाची तारिफ करीत आहेत. हा व्हिडीओ @ragiing_bull नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा व्हिडीओ जुना आहे, परंतु सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी चालकाचं कौतुक केलं आहे.