Elon Musk : या भावाचा नाद कोण करणार! एलॉन मस्कचं खतरनाक पाऊल, बंदी घातलेल्या बँकेच्या खरेदीची तयारी

Elon Musk : एलॉन मस्क हा कोट्यावीर म्हणून सोशल मीडियावर फेमस आहे. त्याच्या मिश्किल टिपण्यांनी लोकांची भरपूर करमणूक होते. पण त्याच्या मनात काय असेल आणि तो काय निर्णय घेईल, हे कोणालाच कळत नाही. आता ही त्याने एक जोरदार चर्चा घडवून आणली आहे.

Elon Musk : या भावाचा नाद कोण करणार! एलॉन मस्कचं खतरनाक पाऊल, बंदी घातलेल्या बँकेच्या खरेदीची तयारी
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली : मिश्किल टिप्पणी करण्यात जागतिक श्रीमंत एलॉन मस्क (Elon Musk) याचा हात कोण धरणार मंडळी? त्याचे निर्णय जेवढे वादग्रस्त तेवढाचा त्याचा स्वभावही विनोदी आहे. विनोदी टिप्पणी करणे हा तर त्याचा नित्यक्रम आहे. जगातील घडामोडींवर नजर ठेवत, त्यावर तो त्याचे मत मांडून मोकळा होतो. तर कधी कधी निर्णय घेऊन मोकळा होतो. तो काय निर्णय घेईल आणि काय करेल हे त्याच्या जवळच्या व्यक्तींना ही कळत नाही. त्याला धक्का देण्यात, सरप्राईज देणे आवडत असल्याचे त्याच्या जवळचे सांगतात. आता हेच बघा ना, अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेवर (American Bank) तिथल्या नियमकाने कारवाई केली. ही बँकच बंद करण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही म्हणाल यात एलॉन मस्कचा काय संबंध तर, बँकेवर निर्बंध लादेपर्यंत हा पठ्ठ्या कुठेच नव्हता, पण निर्बंध लादले आणि याने आर्थिक अडचणीत असलेली ही बँकचं खरेदी करण्याचे संकेत दिले. त्याने ट्विटरवरुन (Twitter) ही प्रतिक्रिया दिली.

अर्थात एलॉन मस्कला कोणी सिरियस घेण्याची गरज नाही, अशा मिश्किल प्रतिक्रियाही उमटल्या. पण ट्विटरच्या बाबतीत मस्कने जी जोखीम पत्करली. त्यावरुन आता अनेक मोठे उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या अमेरिकेत महागाईने कळस गाठला आहे. तर 2008 प्रमाणे मंदीची चाहूल लागलेली आहे. त्यावर अमेरिकन केंद्रीय बँक युएस फेडरल रिझर्व्ह गेल्या वर्षभरापासून उपाय करत आहे. पण हे उपाय थिटे पडले आहेत. या आर्थिक संकटात अनेक स्टार्टअप्स, बँका, आर्थिक वित्तीय संस्था यांची दमकोंडी होत आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन बँकिंग व्यवस्था या कठिण परिस्थितीतून जात आहे. जगभरातील स्टार्टअप्सना आर्थिक मदत करणारी सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley Bank -SVB) या बँकेला ही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. एकाच दिवसात या बँकेचे 70 टक्के शेअर घसरले. डबघाईला आलेली ही बँक बंद करण्याचे आदेश अमेरिकन नियामकाने दिले आहेत. या बँकेची मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (FDIC) याविषयीचे आदेश दिले. एलॉन मस्क यांनी एका ट्विट करत ही बंद होणारी बँक खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.

मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर खरेदीचा करार केला .हा व्यवहार 44 दशलक्ष डॉलरच्या घरात गेला होता. त्यानंतर ट्विटरमध्ये जी उलथापालथ झाली ती जगाने अनुभवली. ट्विटरच्या ऑफिसचे भाडे भरण्यासाठी किंमती वस्ती, फर्निचर विक्री करण्याचा धडका मस्क यांनी लावला होता. एसव्हीबी ही खास करुन जगभरातील स्टार्टअप्सना वित्तीय पुरवठा करत होती. ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक समजण्यात येते. 2022 च्या अखेरीस या बँकेकडे 209 दशलक्ष डॉलरची संपत्ती आणि जवळपास 175.4 दशलक्ष डॉलरची ठेव असल्याची माहिती समोर येत आहे.

रेझरचे सीईओ मिन-लियांग टॅन यांनी ट्विट करत या बँकेविषयी एलॉन मस्क यांना छेडले. त्यांनी, ट्विटरने सिलिकॉन बँक विकत घ्यायला हवी आणि तिला डिजिटल बँक करायला हवं असं ट्विट केलं. या ट्विटवर प्रतिक्रिया उमटल्या. या ट्विटला उत्तर देताना, याविषयीचा प्रस्ताव स्वीकार्हय असल्याची टिप्पणी मस्क यांनी केली आणि हा बातमीचा विषय झाला.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....