Viral News | मुलाखतीसाठी मुलगी पोहोचली, माजी प्रियकर कंपनीचा बॉस निघाला आणि मग…
त्या तरुणीचं नाव रेली जौएट आहे. ती अमेरिकेतील ऑस्टिन शहरातील रहिवासी आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार सहा वर्षापुर्वी तिने एका मुलाशी अचानक प्रेम संबंध तोडले होते. त्यानंतर काही वर्षांनी तो एका कंपनीचा बॉस लेवलला भेटला. ज्यावेळी मुलाखत सुरु झाली त्यावेळी ती तरुणी हे सगळं पाहून एकदम दंग झाली. तरुणीने त्याला तात्काळ ओळखला, त्यानंतर...
मुंबई : भारतात (INDIA) एखाद्या फिल्ममध्ये दाखवतात तशी स्टोरी (LOVE STORY) उजेडात आली आहे, एक मुलगी ज्यावेळी मुलाखत देण्यासाठी गेली, त्यावेळी तिथं गेल्यानंतर मुलाखत देत असताना समोर बसलेला व्यक्ती तिचा माजी प्रियकर असल्याचं समजलं. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला, सहा वर्षापुर्वी अचानक तिने त्या प्रियकरापासून काडीमोड घेतला होता. त्यानंतर मुलीने त्या मुलाचा नंबर सुध्दा ब्लॉक केला होता. ज्यावेळी दोघांची समोरासमोर भेट झाली, त्यावेळी दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली, आता ती संपूर्ण घटना मुलीने सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) सांगितली आहे.
अचानक मुलाशी संबंध तोडले होते
त्या मुलीचं नाव रेली जौएट असं आहे. ती अमेरिका देशातील ऑस्टिन शहरातील निवासी आहे. तिने दिलेली माहिती, सहा वर्षापुर्वी तिने एका मुलाशी संबंध तोडले होते. त्यानंतर काही वर्षांनी दोघांची भेट झाली. त्यावेळी तो कंपनीचा एका बॉस झाला होता. ज्यावेळी मुलाखत माजी प्रियकर घेतोय हे समजल्यानंतर मुलगी प्रचंड घाबरली होती. माजी प्रियकराला प्रेयसीने तात्काळ ओळखलं. रेली जौएट हीला त्यावेळी नोकरीची अधिक गरज असल्यामुळे तिने तिथून पळ काढला नाही. ही सगळी स्टोरी तिने टिकटॉकच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणली आहे. लोकांनी हे सगळं पाहिल्यानंतर तो व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. माजी प्रियकराने तरुणीला नोकरी दिली होती. परंतु तरुणीने नाही म्हणून सांगितलं. आता ती इतर ठिकाणी नोकरी करीत आहे.
सहावर्षापुर्वी तिने ब्रेकअप केलं होतं
मुलीने दिलेली अधिक माहिती, त्यावेळी त्या तरुणीचं वय १९ वर्षे होतं. तेव्हा ती एका तरुणाला भेटली होती. दोघ सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या नात्याला घेऊन तो मुलगा अधिक सिरिअस झाला होता. त्यावेळी जौएट हीच्या मनात तसं काही नव्हतं. त्यावेळी तरुणीने एक दिवस तरुणासोबत सगळे संबंध तोडले आणि त्याचा मोबाईल सुध्दा ब्लॉक केला. व्हिडीओच्या माध्यमातून ती म्हणते की, सहावर्षापुर्वी तिने ब्रेकअप केलं होतं. आज त्याच्याकडे मला नोकरी मागावी लागत आहे. कदाचित त्याच्या नशिबात हे लिहिलं असावं.