Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | रडणाऱ्या मुलासमोर गुंडांनी वडिलांना केली बेदम मारहाण

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या मुलाला बाईकवरुन शाळेत सोडायला निघाली आहे. त्यावेळी त्या मुलाच्या वडिलांना गुंडांनी मारहाण केली आहे.

VIDEO | रडणाऱ्या मुलासमोर गुंडांनी वडिलांना केली बेदम मारहाण
viral videoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 3:38 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीला काही गुंडांनी लहान मुलाच्या समोर मारहाण केली आहे. ती व्यक्ती आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आली आहे. ही घटना पंजाबमधील मनसा (punjab mansa) परिसरातील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. सकाळच्यावेळी ही मारहाण केली आहे. ज्यावेळी ती व्यक्ती शाळेच्या परिसरात बाईकवरुन पोहोचली. त्यावेळी मागून आलेल्या तीन गुंडांनी त्या व्यक्तीला काठ्यांनी मारहाण केली. आपल्या बापाला मारहाण करीत असल्याचं पाहून तो मुलगा अधिक रडत होता.

त्यांच्यातल्या एका गुंडाने त्या मुलाला बाजूला केले

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आली असल्याचं दिसतं आहे. त्या व्यक्तीचा मुलगा पुढं बसला आहे. त्या मुलाच्या वडिलांना या गोष्टीची कल्पना नव्हती की, त्यांच्या मागून गुंड येत आहेत. ज्यावेळी त्यांची बाईक शाळेच्या समोर थांबली. त्यावेळी तीन-चार गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या गुंडांनी त्या व्यक्तीला जोराची मारहाण केली आहे. ज्यावेळी त्या व्यक्तीला मारहाण करीत होते. त्यावेळी त्यांच्यातल्या एका गुंडाने त्या मुलाला बाजूला केले असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

ही घटना बरोबर शाळेच्या समोर घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी इतर मुलांचे पालक सुध्दा तिथं उपस्थित होते. ते पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आले होते. त्या गुंड्यांमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये काही गोष्टींमुळे वाद सुरु असल्याची चर्चा आहे. त्या गुंडांनी त्या व्यक्तीला का मारहाण केली याबाबतची अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असून आरोपींवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.