‘हा’ कुठला प्राणी? आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
नवीन प्राणी हा वरकरणी विचित्र वाटत असला तरी त्याच्या हालचाली पाहिल्यानंतर अनेकजण या दुर्मिळ प्राण्याच्या प्रेमात पडले आहेत. कित्येकांना या प्राण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा मोह आवरता आलेला नाही.
जगभरात विविध प्रकारचे प्राणी आहेत. कित्येक प्राणी हे सध्याच्या घडीला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्या प्राण्यांना दुर्मिळ प्राणी (Rare animal) म्हणून ओळखले जाते. घनदाट जंगल असलेल्या भागांत काही असेही प्राणी आहेत, ज्या प्राण्यांची अजूनही मनुष्याला तितकीशी ओळख झालेली नाही. त्यामुळे अशा दुर्मिळ प्राण्यांचा चेहरा पाहताच अनेकांना हा कुठला प्राणी? असा प्रश्न पडतोच. सध्या सोशल मीडियामध्ये (Social Media) एका आयएफएस अधिकाऱ्याने (IFS Officer) शेअर केलेल्या व्हिडिओतील प्राणी पाहून हाच प्रश्न अनेकांच्या तोंडून विचारला जात आहे. या प्राण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही कोड्यात पडाल हे नक्कीच.
अनेकांना प्रेमात पडणारा प्राणी
नवीन प्राणी हा वरकरणी विचित्र वाटत असला तरी त्याच्या हालचाली पाहिल्यानंतर अनेकजण या दुर्मिळ प्राण्याच्या प्रेमात पडले आहेत. कित्येकांना या प्राण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा मोह आवरता आलेला नाही.
अशा प्राणीप्रेमींनी थेट व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या आयएफएस अधिकाऱ्याला पोस्टवर कमेंट्स करून अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Do you know what animal are these. And why they are in news recently. pic.twitter.com/Ryt4N7l5Dl
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) October 13, 2022
ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर प्रश्नांचा पाऊस
ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करणारे आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियातील युजर्सना देखील प्राण्याबद्दल अधिक माहिती असल्यास ती शेअर करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये एका पोलिसाच्या हातात निरागस प्राण्याची दोन पिल्ले आहेत.
हा प्राणी कुठला आहे, या प्राण्याचे नाव काय आहे, याचे उत्तर मात्र पोलिसाने दिलेले नाही. वन अधिकाऱ्याने या दुर्मिळ प्राण्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
त्यांच्या प्रश्नांवर अनेक लोकांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. त्यावरून दुर्मिळ प्राण्याबाबत लोकांमध्ये किती कुतूहल आहे, याचीही कल्पना येत आहे.