Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Photos : पर्यटकांना आकर्षित करणारं हे ‘उलटं घर’ नेमकं आहे तरी कुठं? चला, जाणून घेऊ

ऑस्ट्रिया (Austria) हा स्मारकं आणि विशिष्ट पर्यटन स्थळां(Tourist Places)नी परिपूर्ण असलेल्या युरोपियन देशां(European Countries)पैकी एक आहे आणि यातील एक वैशिष्ट्य म्हणजे उलटं घर, जे ऑस्ट्रियातील एक अद्वितीय ठिकाण मानलं जातं, कारण या घराद्वारे तुम्हाला उलट दिशेनं जीवनाचा अनुभव घेता येईल.

Viral Photos : पर्यटकांना आकर्षित करणारं हे 'उलटं घर' नेमकं आहे तरी कुठं? चला, जाणून घेऊ
पर्यटकांना आकर्षिक करणारं ऑस्ट्रियातलं उलटं घर
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 2:12 PM

ऑस्ट्रिया (Austria) हा स्मारकं आणि विशिष्ट पर्यटन स्थळां(Tourist Places)नी परिपूर्ण असलेल्या युरोपियन देशां(European Countries)पैकी एक आहे आणि यातील एक वैशिष्ट्य म्हणजे उलटं घर, जे ऑस्ट्रियातील एक अद्वितीय ठिकाण मानलं जातं, कारण या घराद्वारे तुम्हाला उलट दिशेनं जीवनाचा अनुभव घेता येईल. काय आहे हे उलट्या घराचं एकूण गणित, पाहू या… जेव्हा तुम्ही हे घर पहिल्यांदा पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की हे एक असं घर आहे, ज्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता, ज्यामुळं हे दृश्यं पाहायला मिळतंय. वास्तुविशारद इरेक ग्लोवाकी (Erik Glowacki) आणि मारेक रोझान्स्की (Marek Rozanski) यांनी हे घर बांधलं आणि उलट्या घराचं मॉडेल विकसित करण्यासाठी सुमारे 8 महिन्यांचा कालावधी लागला.

सगळंच उलटं

या घराच्या आतील सर्व वस्तू विरुद्ध दिशेनं ठेवलेल्या आहेत. जसं की मुलांची खेळणी, उपकरणं, फर्निचर, दिवे, गॅरेज, कार आणि घरातील सर्व सामान आपल्याला विरुद्ध ठेवलेल्या दिसून येतील. केवळ घराचं उलटं डिझाइनच नाही तर तिकीट बूथदेखील आहे. खरं तर, या डिझाइनसह अशा घरात कोणीही राहू शकत नाही, परंतु हे एक अद्वितीय ठिकाण मानलं जातं आणि वास्तुशास्त्रीय चमत्कारही…

inverted-house-in-Austria 1

ऑस्ट्रियातलं उलटं घर, आतली रचना

तळाशी असलेल्या खिडकीतून प्रवेश

जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला फर्निचरसह विविध वस्तू चांगल्या स्थितीत आणि उलट्या बसवलेल्या आढळून येतील. मजल्यांच्या बाहेर छताला लटकलेल्या गोष्टी आढळतील. तळाशी असलेल्या खिडकीतून आपण प्रवेश करू शकता आणि आपण घराकडे पाहिल्यास आपल्याला एक लहान मुलांची खोली दिसेल ज्यामध्ये छतावर खेळणी आणि काही अडकवलेल्या वस्तू दिसतील. घरामध्ये एक मोठी छत बसवलेली फायरप्लेस आणि तिची चिमणी भूमिगत आहे.

People stand inside room of house, Austrian village

ऑस्ट्रियातलं उलटं घर, आतली रचना, पर्यटकांची भेट

पर्यटनस्थळांनी भरलेला देश

ऑस्ट्रिया हा विविध पर्यटनस्थळांनी भरलेला युरोपीय देशांपैकी एक मानला जातो. कारण निसर्गाचं नयनरम्य रूप, दऱ्या, मैदानं, पर्वत, हिरवीगार ठिकाणं आणि इतर निसर्गरम्य स्थळं मोठ्या संख्येनं पर्यटकांना आकर्षित करतात. ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना, झेल ऍम सी, कप्रून, साल्झबर्ग, इन्सब्रुकसह अन्य पर्यटन शहरे मोठ्या प्रमाणात आहेत. ऑस्ट्रियाच्या क्षेत्रफळाच्या सुमारे 60% भाग पर्वतीय आहे आणि हे पर्वत जगातील अतुलनीय निसर्ग सौंदर्यांपैकी एक मानले जातात.

मुंबईतली एक झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर! वाचा, महिलेचा थक्क करणारा असा प्रेरणादायी प्रवास

Nagin Dance Viral Video : भौतिकशास्त्राचे सर्व नियम मोडणारा ‘असा’ नागीण डान्स पाहिला नसेल, हसून हसून लोटपोट व्हाल!

Video : ‘या’ पक्ष्यांना पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ही बटालियन आहे की संपूर्ण सेना!’

शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.