Video : जंगलाच्या राजावर म्हशी भारी!, सिंहाला केलं ‘भीगी बिल्ली’, हे दोन व्हीडिओ पाहून म्हणाल, ‘म्हशीला मानलं पाहिजे!’

दोन व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिंह अगदी भीगी बिल्ली झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Video : जंगलाच्या राजावर म्हशी भारी!, सिंहाला केलं 'भीगी बिल्ली', हे दोन व्हीडिओ पाहून म्हणाल, 'म्हशीला मानलं पाहिजे!'
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 6:53 PM

मुंबई : सिंह… जंगलाचा ज्याला पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. त्याच सिंहाचा (lion) घाबरलेला व्हीडिओ पाहायला मिळाला तर… असे दोन व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिंह अगदी भीगी बिल्ली झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातल्या एका व्हीडिओत तर म्हशीने सिंहाला (lion and Buffalo viral video) आपल्या डोक्यावर उचलून घेतलं आहे. समोर सिंहाला पाहून म्हैस अगदी आक्रमक होते. मग ही म्हैस जंगलाच्या राजावर अशा प्रकारे तुटून पडते की क्षणात त्याला चितपट करते. आणखी एक असाच व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक सिंहाला म्हशींच्या कळपाने वेढलेलं पाहायला मिळत आहे. तो स्वतःला वाचवण्यासाठी गर्जना करताना पाहायला मिळत आहे. तो इकडून तिकडून धावायला लागतो. पण म्हशी घाबरत नाहीत. त्या त्याला तसंच घेरून ठेवतात.

म्हशीने सिंहाला घेतलं डोक्यावर

या व्हीडिओत तर म्हशीने सिंहाला आपल्या डोक्यावर उचलून घेतलं आहे. समोर सिंहाला पाहून म्हैस अगदी आक्रमक होते. मग ही म्हैस जंगलाच्या राजावर अशा प्रकारे तुटून पडते की क्षणात त्याला चितपट करते. त्याला जमिनीवर आपटते. हा व्हीडिओ पाहून अनेकजण थक्क झालेत. सिंहाला असं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय. हा व्हीडिओ नितेश नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओ पाहून लोक या म्हशीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.

सिंहाला म्हशीचा विळखा

आणखी एक असाच व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक सिंहाला म्हशींच्या कळपाने वेढलेलं पाहायला मिळत आहे. तो स्वतःला वाचवण्यासाठी गर्जना करताना पाहायला मिळत आहे. तो इकडून तिकडून धावायला लागतो. पण म्हशी घाबरत नाहीत. त्या त्याला तसंच घेरून ठेवतात. wildlife_stories_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओला जंगलाच्या राजाला म्हशींनी घेरलं, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. याला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 3 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

संबंधित बातम्या

Video : ऐकावं ते नवलच!, लग्नातल्या जेवणात गांजा मिसळला, लग्नमंडपातून पाहुणे थेट हॉस्पिटलमध्ये…

Video : आलिया भटच्या राधा गाण्यावर दोन तरूणी थिरकल्या… लोक म्हणतात “निव्वळ भारी!”

ड्रायव्हरची तलप, प्रवाश्यांना त्रास, चहा पिण्यासाठी चक्क ट्रेन थांबवली!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.